Adani महाराष्ट्र सरकारचे बॅास आहेत का? आम आदमी पार्टीचा सवाल

Update: 2022-06-17 12:47 GMT

महाविकास आघाडी सरकार (MVA)सिद्धार्थ कॉलनीला वीज देत नाहीत, कारण येथील रहिवासी दलित (Dalit)समाजाचे आहेत,चेंबुर (Chembur) दलित वस्तीची वारंवार वीज खंडित केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) दलितांवर असा अमानुष अत्याचार होत असून सिद्धार्थ कॉलनीतील रहिवाश्यांना अंधारात राहावं लागतं आहे. यावर तोडगा काढण्याचे सोडून महाविकास आघाडी सरकार अदानी पॉवर कंपनीला सुट देत आहे, असा आरोप आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारचे अदानी पॉवरवरील नियंत्रण सुटले असून चेंबुर येथील सिद्धार्थ कॉलनीतील दलित वस्ती अनेक महिनी विजेचा प्रश्न भेडसावत आहे. सिद्धार्थ कॉलनीतील रहिवाश्यांना अंधारात चाचपडत राहावं लागत आहे.सिद्धार्थ कॉलनीतील सुमारे ३.५०९ कुटुंबांचा वीज कंपनीसोबत थकीत वीजबिलांचा दीर्घकाळ वाद सुरू असल्याची माहिती सरकारला आहे.

स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्यासह अनेक राजकारणी हा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत. सिद्धार्थ कॉलनीत तीन प्रकारचे रहिवासी आहेत. एक जे सुरुवातीपासूनच त्यांची बिले भरत आहेत. दोन लोकसंख्येचा एक मोठा भाग जो २०१९ पासून त्यांची बिले भरत आहे. तीन, काही ज्यांनी तुरळकपणे बिले भरली आहेत "त्यांची बिले कोणी भरली की, नाही याचा तपशील न घेता अदानी पॉवरने संपूर्ण सिद्धार्थ कॉलनीतील वीज बंद केली आहे.

सिद्धार्थ कॉलनीत रहिवासी गरीब व दलित समाजाचे असून ही लोक काही करू शकत नाही, अशी खंत प्रीती शर्मा यांनी व्यक्त केली. सिद्धार्थ कॉलनीतील दलित वस्तीतील रहिवाश्यांना हक्काची वीज मिळावी याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र लिहिले आहे. पत्रात नमूद करण्यात आले आहे की, संपूर्ण सिद्धार्थ कॉलनी ची वीज बंद करणं हे दुर्दैवी असून ज्यांनी कोणी वीज देय भरले आहेत. त्यांना वीज परत मिळवून देणे आणि कायद्यानुसार वीज भरले आहे, तरीदेखील वीज बंद करणे हा गुन्हा असून सरकार अदानी पॉवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.

सिद्धार्थ कॉलनीतील लोकांना वीज नाकारणे हे विशेषत: मे आणि जून महिन्यांत त्यांना जीवनावश्यक वस्तू नाकारण्यासारखे आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि जे आजारी आहेत. त्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो कारण ही जवळजवळ दैनंदिन वीज १२ तासांपर्यंत असते असे त सिद्धार्थ कॉलनीतील त्रस्त नागरिकांनी आहेत. महाराष्ट्र सरकारचे बॅास आहेत का अदानी ? असे आम आदमी पार्टीच्या प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले.

Tags:    

Similar News