आयोध्येत शिवसेनेची बॅनरबाजी, नकली विरुध्द असली वाद रंगणार?

Update: 2022-05-08 07:21 GMT

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत भुमिका घेतल्याने शिवसेना हिंदूत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. तर राज ठाकरे यांनी आयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरे यांचा आयोध्या दौरा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आयोध्या दौऱ्यावरून राज्यात राजकारण तापले असतानाच उत्तर प्रदेशमध्येही शिवसेनेने बॅनरबाजी केली आहे.

राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेतून 5 जून रोजी आयोध्या दौरा जाहीर केला. तसेच औरंगाबाद येथेही राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली. तर भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी शिवसेनेचे हिंदूत्व हायजॅक केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तर राज ठाकरे यांच्यापाठोपाठ शिवसेनेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आयोध्या दौरा जाहीर करण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेशात असली नकलीबाबत शिवसेनेने बॅनरबाजी केली आहे.

शिवसेनेने रस्त्यावर बॅनर लावून त्यावर लिहीले आहे की, असली आ रहा है, नकली से सावधान. तर या अक्षरांसहच बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तसेच रामाच्या फोटोसह जय श्रीराम असे लिहीले आहे.

त्यामुळे कोणाचं हिंदूत्व असली आणि कोणाचे हिंदूत्व नकली, यावरून वाद रंगण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशातील बॅनरबाजीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, उत्तरप्रदेशमध्ये असली नकली मध्ये जे बॅनर लावले आहेत. त्याबाबत आमच्याकडे माहिती नाही. मात्र उत्तर प्रदेशच्या लोकांना राजकारण चांगले कळते. त्यामुळे नकली किंवा राजकीय भाव घेऊन जे उत्तर प्रदेशला जातील. त्यांना जनता स्वीकारणार नाही. तसेच नकली भाव घेतल्यामुळे प्रभु श्रीरामही त्यांना पावणार नसल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

Tags:    

Similar News