बेरोजगारी आणि खासगीकरणावरुन भाजप खासदाराचा मोदी सरकारला घरचा आहेर

Update: 2022-06-01 06:10 GMT

मोदी सरकारच्या आठ वर्षाच्या कारकिर्दीचा लेखाजोखा सर्वत्र मांडला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी या ८ वर्षात मान शरमेने खाली जाईल असे कोणतेही काम केले नसल्याचा दावा केला आहे. तर ८ वर्षात देशाने किती प्रगती केली याची आकडेवारीही दिली जाते आहे. पण विरोधकांनी या ८ वर्षात वाढलेल्या बेरोजगारी, महागाईवरुन मोदी सरकारवर टीकास्त्र कायम ठेवले आहे. त्यातच आता भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

कोरोना काळाचा उल्लेख करत वरुण गांधी यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला आहे. "कोरोनाच्या त्या भयावह परिस्थितीचा फटका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना बसला आहे. या विद्यार्थ्यांची दोन वर्ष वाया गेल्याने त्यांच्या भवितव्याचा विचार करणं आपले कर्तव्य आहे. त्यामुळे विविध परीक्षांसाठी असलेल्या वयोमर्यादेमध्ये २ वर्षांची सूट देण्याची मागणी वरुण गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वरुण गांधी यांनी सातत्याने बेकारी आणि महागाईसारख्या मुद्द्यांवर आपल्याच सरकारचे कान टोचले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सरकारच्या ७२ हजार पदं रद्द करण्याच्या निर्णयावर टीका केली होती. रेल्वेतर्फे रद्द केले जाणाऱ्या एकेका पदामुळे त्यासाठी तयारी करणाऱ्या कोट्यवधी युवकांच्या आशा संपुष्टात येत आहेत. ही आर्थिक रणनीती आहे की खासगीकरणाकडे टाकलेले पाऊल आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Tags:    

Similar News