महाविकास आघाडी सरकार 'खुर्ची बचाव'कार्यात व्यस्त - आ. पडळकर

महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे उद्धवस्त झाली असताना महाविकास आघाडी सरकार खुर्ची बचाव कार्यात व्यस्त असल्याची टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सोबतच कोणताही निकष न लावता सरकारने पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Update: 2021-07-28 06:25 GMT

महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे उद्धवस्त झाली असताना महाविकास आघाडी सरकार खुर्ची बचाव कार्यात व्यस्त असल्याची टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सोबतच कोणताही निकष न लावता सरकारने पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे उद्धवस्त झाली असताना महाविकास आघाडीचे कर्ते शरद पवार निष्क्रीय मुख्यमंत्र्यांची बाजू सांभाळण्यासाठी दौरे का केले म्हणून पुतण्याची कान उघडणी करतांना दिसत आहेत असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे. पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे केवळ 'सरकार खुर्ची बचाव'कार्यात व्यस्त असल्याचं त्यांनी म्हटल आहे. कर्जबुडव्या साखर कारखान्यांना 3800 कोटी रुपये देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत मात्र, अतिवृष्टीमुळे ज्यांचे प्रपंच उद्धवस्त झाले त्यांच्यासाठी सरकार तिजोरी उघडायला तयार नाही असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकरांनी राज्य सरकावर निशाणा साधला.

फडणवीस सरकारने कोणताही निकष न लावता केली होती मदत

भाजप सत्तेत असतांना पुरग्रस्तांसाठी त्यांनी तातडीने मदत केली होती. रोख स्वरुपात पूरग्रस्त नागरिक , शेतकरी, व्यापारी यांना तत्कालीन सरकारने आर्थिक मदत केली होती, तत्कालीन फडणवीस सरकारने कोणतेही निकष न लावता घरपडीला 95000 ,भाड्याने राहण्यासाठी 25000, व्यापाऱ्यांना 50000 तर शेतकऱ्यांना हेक्टरी 50000 मदत केली होती. त्याप्रमाणे हे महाविकास आघाडी सरकार आता पूरग्रस्तांना मदत का करत नाही ? असा सवाल पडळकरांनी केला.

सरकारच्या 'लॉकडाऊन -लॉकडाऊन'खेळामुळे अर्थव्यवस्था कोलमडली

एकीकडे महाविकास आघाडी सरकारच्या 'लॉकडाऊन -लॉकडाऊन'खेळामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय आणि व्यापारी रडकुंडीला आलाय. त्यात आता या महापुरामुळे दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागतोय. व्यापाऱ्यांना व सामान्य जनतेला कुठल्याही निकषाच्या चक्रव्यूव्हात न अडकवता आधी तातडीने प्रत्येकी 1 लाख रूपयाची मदत करण्याची मागणी आमदार पडळकरांनी केली आहे. शिवाय व्यापाऱ्यांना वर्षभरासाठी भाडेपट्टी व वीजबील माफीची मदत जाहीर करून लवकरात - लवकर अंमलात आणावी असं आमदार पडळकरांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News