मराठा आरक्षण: महाविकास आघाडीची महत्वाची बैठक

मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली.

Update: 2021-08-09 04:04 GMT

courtesy social media

मुंबई : मागील काही दिवसांपासून विरोधकांनी सरकारला मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून चांगलेच धारेवर धरलं आहे. त्यातच केंद्र सरकारने आरक्षणावर कायदे करण्याचा अधिकार हा राज्याला दिला आहे. मात्र, इंद्रा सहानी खटल्यातील निर्णयानुसार 50 टक्कांच्यावर आरक्षण देता येणार नसल्याने राज्य सरकार कोंडीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने घातलेली 50 टक्क्यांची मर्यादा शिथील करण्यात यावी अशी मागणी राज्यांनी केली आहे. तर महाराष्ट्रात देखील ही मर्यादा काढून टाकावी किंवा मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी केली आहे. याच मुद्द्यावर काल महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे मोठे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलवली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे, खा.अभिषेक मनु सिंधवी, खा.संजय राऊत , काँग्रेसचे नेते पी चिदंबरम, आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आदी वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत आरक्षणची 50 टक्के मर्यादा शिथील करण्यात यावी, यावर सर्वांचेच एकमत झाल्याची माहिती आहे. दरम्यान, आरक्षणाची मर्यादा शिथील करण्यासाठी केंद्राने संसदेत प्रस्ताव मांडावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.

Tags:    

Similar News