'मेक इन इंडिया'च्या वेगाला 'ब्रेक' ? उत्पादन क्षेत्राचा PMI नऊ महिन्यांच्या नीचांकावर !

'Make in India' momentum 'braked'? Manufacturing sector PMI at nine-month low!

Update: 2025-12-01 11:27 GMT

भारताच्या उत्पादन क्षेत्राची (Manufacturing Sector) घोडदौड नोव्हेंबर महिन्यात काहीशी मंदावली आहे. एचएसबीसीने (HSBC) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत उत्पादन क्षेत्राचा 'पर्चेसिंग मॅनोजर्स इंडेक्स' (PMI) ऑक्टोबरमधील ५९.२ वरून घसरून नोव्हेंबरमध्ये ५६.६ वर स्थिरावला आहे.

सर्वच आघाड्यांवर नरमाई

नवीन ऑर्डर्स (New Orders), प्रत्यक्ष उत्पादन (Output), खरेदी प्रक्रिया (Purchasing Activity) आणि रोजगार निर्मिती (Employment) या सर्वांमध्ये वाढ नोंदवली गेली असली, तरी या वाढीचा वेग फेब्रुवारीपासूनचा सर्वात कमी आहे. थोडक्यात, इंजिन सुरू आहे, पण त्याचा वेग लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

चिंतेची कारणे काय ?

नवीन निर्यात ऑर्डर्समध्ये गेल्या वर्षभरातील सर्वात संथ वाढ नोंदवली गेली आहे, जे जागतिक बाजारपेठेतील मागणीतील नरमाई स्पष्टपणे दर्शवते. विक्रीतील या संथ वाढीमुळे कंपन्यांनी कच्च्या मालाची खरेदी आणि नवीन नोकरभरतीवर हात आखडता घेतला आहे

रोजगार निर्मिती मंदावली

रोजगार निर्मितीवर परिणाम नवीन ऑर्डर्सच्या वाढीचा वेग मंदावल्याने, उत्पादकांनी नोकरभरती आणि खरेदी प्रक्रियेत समायोजन (Adjustments) केले आहे. अहवालानुसार, रोजगार निर्मिती सुरू असली तरी, गेल्या २१ महिन्यांतील सलग वाढीच्या काळातील हा सर्वात संथ वेग आहे

निर्यात घटली

आफ्रिका, आशिया, युरोप आणि मध्य पूर्वेकडील ग्राहकांकडून ऑर्डर्स मिळाल्याने आंतरराष्ट्रीय विक्री अनुकूल राहिली. तरीही, एकूण निर्यात कामगिरीच्या गतीमध्ये सौम्य घट (Mild loss of momentum) झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भविष्यातील वेध वाढीचा वेग मंदावला असला तरी, पुढील १२ महिन्यांत उत्पादन वाढवण्याबाबत कंपन्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे. मात्र, ही सकारात्मक धारणा (Positive Sentiment) गेल्या साडेतीन वर्षांतील नीचांकी पातळीवर आली आहे. , उत्पादन क्षेत्र विस्तारत असले तरी त्याचा वेग लक्षणीयरीत्या मंदावला आहे. कमजोर देशांतर्गत मागणी, संथ निर्यात आणि घटलेली रोजगार निर्मिती यांचा एकूण आर्थिक गतीवर दबाव येत आहे.

Tags:    

Similar News