Google Gemini आणि GPT-5 ला टक्कर ! चीनने लाँच केले शक्तिशाली DeepSeek V3.2

Google Gemini and GPT-5 clash! China launches powerful DeepSeek V3.2

Update: 2025-12-02 07:58 GMT

अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील तंत्रज्ञानावर आधारित मक्तेदारीला चीनने पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे. चीनच्या ‘डीपसीक’ (DeepSeek) या कंपनीने नुकतेच आपले दोन अत्याधुनिक एआय मॉडेल्स— DeepSeek V3.2 आणि DeepSeek V3.2 Special— बाजारात आणून या स्पर्धेत नवी खळबळ माजवून दिली आहे. जागतिक महासत्तेच्या स्पर्धेत केवळ शस्त्रास्त्रे नव्हे, तर ‘डेटा’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) हेच आता युद्धाचे नवे रणांगण ठरले आहे.

या घडामोडीचे गांभीर्य समजून घेण्यासाठी या मॉडेल्सची रचना समजून घेणे गरजेचे आहे. ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर माहिती देताना कंपनीने स्पष्ट केले आहे की, ही नवी प्रणाली केवळ माहितीची देवाणघेवाण करणारी नसून, ती ‘विचारशक्ती’ (Reasoning) आणि ‘साधनांचा वापर’ (Tool Usage) यावर बेतलेली आहे. यातील ‘V3.2’ हे मॉडेल ‘थिंकिंग’ आणि ‘नॉन-थिंकिंग’ अशा दोन्ही मोडमध्ये काम करते. ‘रीजनिंग’ला थेट टूल्सशी जोडणारे पहिलेच मॉडेल ठरले आहे.

येथे चिनी तंत्रज्ञानाचा दावा थक्क करणारा आहे. त्यांच्या मते, V3.2 ची कामगिरी अद्याप अनावरण न झालेल्या ‘GPT-5’ च्या तोडीची आहे, तर V3.2 स्पेशल हे मॉडेल गुगलच्या ‘Gemini 3.0-Pro’ ला थेट टक्कर देते. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड (IMO) सारख्या अत्यंत क्लिष्ट स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याइतपत या मॉडेल्सची बौद्धिक झेप आहे, हे विशेष.

या तंत्रज्ञानाच्या यशाचे रहस्य ‘डीपसीक स्पार्स अटेंशन’ (DeepSeek Sparse Attention - DSA) या तंत्रात दडलेले आहे. यामुळे प्रचंड वेगाने आणि अत्यंत कमी खर्चात ही मॉडेल्स अमेरिकन स्पर्धकांहून अधिक कार्यक्षमता देऊ शकतात. याचा थेट परिणाम अर्थकारणावर होत आहे. जानेवारी महिन्यात जेव्हा डीपसीकच्या चॅटबॉटने आपल्या कार्यक्षमतेची झलक दाखवली, तेव्हा अमेरिकेतील बड्या टेक कंपन्यांचे धाबे दणाणले होते आणि शेअर बाजारात त्यांना अब्जावधी डॉलर्सचा फटका बसला होता.

Tags:    

Similar News