तिरुमला तिरुपती देवस्थानम्‌ला (TTD) मोठी देणगी,

'श्रवणम् प्रकल्पा'ला 20 लाखांच्या 105 श्रवणयंत्राचे दान

Update: 2025-11-25 08:30 GMT

तिरुमला तिरुपती देवस्थानम्‌ (TTD)च्या ‘श्रवणम् प्रकल्पा’साठी एका भक्ताने 20 लाखांच्या 105 श्रवणयंत्राचे दान केले आहे.

ही देणगी तिरुपती येथील एन. विराट (N Virat) यांच्या नावाने देण्यात आली आहे. विराट यांचे वडिल अमर नागराराम यांनी ही श्रवणयंत्र TTD चे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंगल यांच्याकडे सुपूर्द केल्या.

TTD च्या श्रवणम् प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलांना ही श्रवणयंत्र दिली जाणार आहेत. या उपकरणांमुळे प्रशिक्षणानंतर मुलांना श्रवणदोषाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती अमर नागराराम यांनी दिली आहे.

तिरुपतीतील विराट यांनी सोमवारी 20 लाखांच्या 105 श्रवणयंत्र TTD ला दान केल्या आहेत,अशी माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानम्‌ने अधिकृत निवेदनात दिली आहे. (Tirumala Tirupati Devasthanam)

TTD हे आंध्र प्रदेश सरकारचे एक स्वतंत्र ट्रस्ट असून ते तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर मंदिराचे तसेच संलग्न मंदिरांचे संचालन आणि अर्थव्यवस्थेची देखरेख करते.

TTD 'श्रवणम् प्रकल्प' चालवतो. या प्रकल्पात ऐकू न येणाऱ्या मुलांवर उपचार करण्यात येतात. हा प्रकल्प 2006 साली सुरू झाला असून सुरुवातीला 15 बालकांना मदत केल्यानंतर आता या प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

Tags:    

Similar News