Pune Municipal Elections : NCPला मोठा धक्का: शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा
अशा राजीनाम्यांची सध्याच्या राजकारणात गरज... "जेव्हा घटनात्मक, सर्वसमावेशक राजकारण आणि द्वेषप्रेरित राजकारण यांच्यातील सीमारेषा धूसर होऊ लागतात, तेव्हा अशा परिस्थितीत तात्त्विक तडजोडी करत बसण्याऐवजी अंतर्मुख होऊन विचार करणे आणि सोपविलेल्या जबाबदारीपासून दूर जाणे, हेच श्रेयस्कर असते. द्वेषाच्या राजकारणाला माझ्या गणितात अजिबात जागा नाही"
X
NCP Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी असलेले प्रशांत जगताप Prashant Jagtap Resignation यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा Pune Municipal Elections पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दिल्यानं शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रशांत जगताप यांनी X एक्सवर राजीनामासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. या राजीनामा पत्रात तत्त्व आणि संविधाननिष्ठेचा मुद्दा त्यांनी मांडला आहे.
जगताप यांनी म्हटले आहे की, त्यांचा हा निर्णय शांत चित्ताने आणि सद्सद्विवेकबुद्धीने घेतला आहे. "कुठलंही पद अथवा निवडणूक अशी तात्कालिक कारणे नाही. तर तत्त्वांचं मनात चाललेलं द्वंद्व मला या निर्णयापर्यंत घेऊन आलं," असे ते म्हणाले. ते पुढे म्हणतात, राजकीय सत्ता ही सर्वसामान्य माणसाच्या स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी असते. जात, धर्म, भाषेच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांच्या कल्याणाचा विचार हाच खरा राष्ट्रवाद आहे.
नेमकं काय म्हटलंय पत्रात...
धन्यवाद...
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) December 24, 2025
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा आणि त्याचवेळी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही देण्याचा माझा निर्णय अतिशय शांत चित्त आणि स्पष्ट सद्सद्विवेकबुद्धीचा कौल यांचा परिपाक आहे. कुठलंही पद अथवा निवडणूक अशी तात्कालिक कारणे…
दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात युतीच्या चर्चा सुरू असताना जगताप यांनी यापूर्वीच या युतीला विरोध दर्शवला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादीच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगताप यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत अद्याप स्पष्टता आणलेली नाही, मात्र जनतेशी असलेली बांधिलकी कायम राहील, असे त्यांनी सांगितले. हा निर्णय शरद पवार गटासाठी निवडणुकीपूर्वी मोठा झटका मानला जात आहे. पक्षाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.






