Bhima Koregaon Victory Pillar : विजयस्तंभाला फक्त १ दिवसाची मानवंदना, बाकी ३६४ दिवस दुर्लक्ष !
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला आपण येतो ते पण मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली म्हणून... पण ३६४ दिवस भीमा कोरेगाव विजयस्तंभ कुणाच्या ताब्यात असतो ते माहीत आहे का? काय आहे पावणे दहा एकर जागेवरील वाद? न्यायालयीन लढाईत आतापर्यंत काय झालं? ऐतिहासिक जमिनीसाठी दादाभाऊ अभंग यांचा लढा. मानवंदनेच्या पलिकडे काय करायचे आहे आपल्याला... वाचा
X
Bhima Koregaon Victory Pillar भीमा कोरेगाव विजयस्तंभ व विजयस्तंभ परिसरातील पावणे दहा एकर जागेवर माळवदकर कुटुंबाचा ताबा आहे Malwadkar family has control over the Bhima Koregaon Victory Pillar. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट Mumbai High Court असल्याने प्रत्येक वर्षी मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. किती लोकांना हे माहित आहे??? ९९.९९% लोकांना माहित नाही व ज्यांना माहिती आहे ते मौन धारण करेन गप्प बसले आहेत त्यांना कुणाची भीती आहे ते माहित नाही.
केवळ एक दिवस परवानगी मिळते व पुन्हा विजयस्तंभासह जागेचा ताबा माळवदकर कुटुंबाकडे जातो. वर्षभर हे कुटुंब जमिनीच्या मधून शेतीचे उत्पन्न घेते. या विरोधात मागील पंधरा वर्षे प्रशासकीय व न्यायालयीन लढा माझ्या नेतृत्वाखाली भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती लढत असून अनेक निकाल या समितीच्या बाजूने लागले आहेत. अनेक वेळा या न्यायालयीन लढ्यात सामील व्हा असे आवाहन केले तर त्याकडे कोण लक्ष देत नाही. लाखों लोक एक दिवस या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येतात आणि नंतर ऐतिहासिक विजयस्तंभाकडे दुर्लक्ष करतात.
हा विजयस्तंभ व त्या परिसरातील जागा आपल्याला जर ताब्यात घ्यायची असेल तर प्रशासकीय व न्यायालयीन लढा सर्वांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे लढला पाहिजे व यासाठी आपण भीमा कोरेगाव विजयस्तंभाचे अतिक्रमण तसेच सध्याची न्यायालय स्थिती काय आहे हे तालुक्यात, शहरात आणि प्रत्येक जिल्ह्यात समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून यासाठी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती या समितीच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवत असून हा लढा समजून घ्या.
केवळ एक दिवस भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मानवंदना आपण देणार आणि वर्षभर त्याकडे दुर्लक्ष करणार ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. भीमा कोरेगाव एक जानेवारीला आपण येतो ते पण मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली म्हणून पण ३६४ दिवस भीमा कोरेगाव विजयस्तंभ कुणाच्या ताब्यात असतो ते माहीत आहे का????? एक दिवस येतात पण ३६४ दिवस काय करतात??? मग साथ देणार का???? की फक्त १ दिवस चलो भीमा कोरेगाव...नंतर २ जानेवारी पासून???
१ जानेवारी शौर्य दिनाच्या कार्यक्रमासाठी केवळ एक दिवसाची मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी मिळते व नंतर हा विजयस्तंभ व त्या परिसरातील जागा पुन्हा माळवदकर कुटुंबाच्या ताब्यात जाते हे सत्य आहे. माळवदकर कुटुंबाच्या विरोधात प्रशासकीय व न्यायालयीन लढा सुरू असून आतापर्यंतचे सर्व आदेश आपल्या बाजूने लागले ही जमेची बाजू आहे. हा लढा गतीमान करण्यासाठी व संविधानात्मक न्यायालयीन मार्गाने लढण्यासाठी या विषयाची जनजागृती होऊन लोक लढा व्हावा ही अपेक्षा आहे. या लढ्यात आपल्याला कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या माध्यमातून जर खरंच न्यायालयीन मार्गाने लढायचे असेल तर आपण 9702845000 या what's app नंबर वर आपले नाव, तालुका, जिल्हा किंवा शहराचे नाव पाठवा...प्रत्यक्ष लढणाऱ्या भीमसैनिकांनी संपर्क साधावा...१ जानेवारीपुरते जागे झालेले यांचे येथे काम नाही...
ऐतिहासिक लढ्यात सामील होण्याचं आवाहन
काही लोक जाणीवपूर्वक सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडिओद्वारे भीमा कोरेगाव इतिहासावर बोलून भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क न्यायालयीन लढा या मूळ विषय भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहे व त्याला तुम्ही बळी पडत आहे. भीमा कोरेगावचा इतिहास संपूर्ण जगाला माहित आहे. कुणाच्या सोशल मीडियावर काही बोलून त्या इतिहासात कुठला बदल होणार नाही. आपण त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या मूळ विषयावर लक्ष केंद्रित करा... भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व जागेचा मालकी हक्क या न्यायालयीन लढ्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत असून ज्यांना काम करायचे आहे त्यांनी आपले नाव, तालुका, जिल्हा, शहर 9702845000 या what's app नंबरवर पाठवा.. खरी न्यायालयीन लढायला सज्ज व्हा... नुसते 1 जानेवारीला काही हौशे नवशे व गवशे आव्हान प्रती आव्हान देऊन 2 तारखेला विसरून जातात. आपल्याला आपल्या पूर्वजांच्या शौर्याचे प्रतीक विजयस्तंभ आपल्या ताब्यात मिळवायचा असेल तर कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती मध्ये सहभागी व्हा.
दादाभाऊ अभंग
अध्यक्ष
भीमा कोरेगाव विजय स्तंभ संरक्षण व संवर्धन समिती, कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती
(साभार- वरील माहिती दादाभाऊ अभंग यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)






