Home > Top News > जनरेशन झेड ते तियानमेन चौक तरुणाईच्या लढ्यांचा वारसा"

जनरेशन झेड ते तियानमेन चौक तरुणाईच्या लढ्यांचा वारसा"

"The legacy of youth struggles from Generation Z to Tiananmen Square"

जनरेशन झेड ते तियानमेन चौक तरुणाईच्या लढ्यांचा वारसा
X

तरुणपण यौवनावस्था ही एक अतिशय सुंदर मोहक नाजूक तरल, हजार नव्या आव्हानांना पारखुण घेणारी एक सुंदर अवस्था असते. तारुण्याच्या पंखात आकाशाला गवसणी घालण्याचे बळ असते म्हणूनच या अवस्थेला बळकट अवस्था म्हणता येईल... खर तर साऱ्याच स्वप्नांच्या उद्याच्या साऱ्या कल्पनांचा जन्म व विस्तार तरुण्यातूनच होतो. धुंद करणार्‍या बेंधुद क्षणातून उद्याचा सूर्य पाहण्याचा प्रयत्न असतोच तारुण्य, तारुण्य हे अभिप्राय नोंदविण्याचे वय नसते कधी.

जगभर तरुणाई इतिहासच रचतोय..बदल, क्रांती,उत्कांती हे सगळे तरुण घडवित आलेले आहेत तरुणाईचे विविध रुपे आपल्याला पाहायला मिळतात ,चंद्रावर जाणारी , अवकाशात विहार करणारी, पृथ्वीचा देठ शोधण्यासाठी रात्रंदिवस महाकाय प्रयोग करणारी तरुणाई ,आँलिपिक मध्ये विजयांचे पंख फडकवणारी तरुणाई . तारुण्य म्हणजे प्रेम, शौर्य, साहस, त्यांग, पराक्रम, यांनी भरलेला महाबूक असून व्यावंस्थेविरुध्द बंड करून प्रश्न विचारणारी तरुणाई असते सर्व नव्या स्वप्नांचा परिपाक असतो तरुणाई केवळ आपल्याच स्वप्नाच्या दुनियेत रममाण होणे ही तरुणाई नव्हे तर न पटणार्‍या खटकणार्या गोष्टी धिटाईने सांगणे, त्या साठी आंदोलने उभारणे, सत्तेचे अनिर्बंध स्वरुप दिसू लावल्यानंतर सत्ताधीशांच्या आशनाखाली सुरूंग पेरण व व्यावस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी बेभानपणे आयुष्य उधळणे हे पण तरुणाईचे वैशिष्ट्ये आहे एक संस्कृतीरक्षक आपल्या प्राचीन वैदिक ऋषी यांचे उदाहरण सांगता येईल तरुणपणी शंकराचार्य यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी हिंदू धर्म प्रसारकाचे कार्य केले जगाला सगळे मुलभूत तत्वज्ञान देणारे प्लेटो, अरिस्टाँटल, हे सगळे तरुण होते ,मानवी सम्यक विचाराचे कार्य बुध्दाने तारुण्यात केले, फ्रांस, अमेरिका या देशांत क्रांत्या झाल्या त्याचे शिल्पकार तरुणच होते.

आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे सगळे नेते तरुण होते महात्मा गांधींच्या संपर्कात आलेले नेते जवाहरलाल नेहरू तेव्हा २६वर्षाचे, मौलाना अबुल कलाम आझाद ३५,सरदार पटेल ४० ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांनी आपल्या तारुण्यात परिवर्तनाचे लढे उभारले, वयाच्या २३ व्या वर्षी भगतसिंग फासावर गेले भारतीय स्वातंत्र्य लढा हा तरुणाईचा होता. त्यावेळेही तरुण आंदोलन करत होते, तेव्हा ही प्रस्थापित त्या तारुण्याला विरोधच करत होते. ही सारी उदाहरण, तरुणांची क्रांती करण्याच्या, बदल घडवण्याची ताकद फार मोठी असते. जेव्हा जेव्हा तरुण रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांनी निरकूंश राजवटीची मुळे हादरवली.इजिप्तची जास्मिन क्रांती, इराणची हिजाब क्रांती, चीनमधील तियानमेन स्क्वेअर हत्याकांड, बांगलादेशातील विद्यार्थी चळवळ आणि आता नेपाळमधील उठाव सोमवारी नेपाळची राजधानी काठमांडूच्या रस्त्यांवर असेच काहीसे दिसून आले, जेव्हा जनरेशन झेडचे तरुण निषेध करण्यासाठी बाहेर पडले. त्यांच्या हातात बॅनर होते, ज्यावर लिहिले आहे - आम्ही भ्रष्टाचारासाठी तरुणांचे भविष्य विकू देणार नाही. खरं तर, भष्टाचारी निरंकुश सरकारने सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळमध्ये जनरेशन झेडची क्रांती आता रक्तरंजित झाली आहे.

त्याचे रूपांतर क्रांतीत झाले आहे. या आंदोलनात निदर्शकांच्या मृत्यूच्या बातम्याही येत आहेत. तथापि, तरुणांनी त्यांच्या मागण्यांविरुद्ध आवाज उठवण्याची ही पहिलीच चळवळ नाही. याआधीही तरुणांनी क्रांतीचा रणशिंग फुंकले आहे. या आंदोलनाने चीन आणि बांगलादेशमधील विद्यार्थी चळवळीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत. जाणून घेऊया तरुणांच्या कोणत्या चळवळी आहेत ज्यांचा मोठा आवाज अजूनही लोकांना आठवतो.

ट्युनिशियाची क्रांती (२०११)-जस्मिन क्रांती ही उत्तर आफ्रिकेतील ट्युनिशियातील एक मोठी जनआंदोलन होती, ज्याने संपूर्ण अरब जगात अरब स्प्रिंगचा पाया घातला. झीन एल अबिदिन बेन अली हे ट्युनिशियाचे राष्ट्रपती होते. त्यावेळी देशातील लोक भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त होते. एके दिवशी मोहम्मद बौआझिझी नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी त्रास दिला आणि नंतर त्याचे भाजीपाला दुकानही काढून घेतले. या माणसाने आत्महत्या केली आणि त्यानंतर जनता संतप्त झाली. बौआझिझीच्या आत्मदहनामुळे देशभरातील तरुण आणि सामान्य जनता रस्त्यावर आली. ज्यामुळे २०११ मध्ये राष्ट्रपती झिब एल अबिदिन बेन अली यांना पद सोडावे लागले.

हाँगकाँग निदर्शने (२०२०)-हाँगकाँगमधील निषेध हा अलिकडच्या दशकातील सर्वात मोठा तरुणांचा निषेध असल्याचे म्हटले जाते. हे आंदोलन प्रत्यार्पण विधेयक आणि चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाविरुद्ध करण्यात आले होते. प्रत्यक्षात, २०१९ मध्ये, हाँगकाँग सरकारने प्रत्यार्पण विधेयक सादर केले. या विधेयकात हाँगकाँगमधील सर्व संशयित गुन्हेगारांना तुरुंगात पाठवण्याची तरतूद होती.

इजिप्शियन युवा क्रांती (२०११)-जेव्हा आपण युवा क्रांतीबद्दल बोलतो तेव्हा इजिप्तमधील युवा चळवळ निश्चितच लक्षात येते. येथे, युवा चळवळीने ३० वर्षे राज्य करणारे हुकूमशहा होस्नी मुबारक यांना पायउतार होण्यास भाग पाडले. वाढत्या भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरिबी आणि स्वातंत्र्याच्या अभावाविरुद्ध लाखो तरुण तहरीर चौक (कैरो) आणि इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरले. अखेर २५ जानेवारी २०११ रोजी मुबारक यांना सत्तेवरून काढून टाकण्यात आले.

हिजाबविरुद्ध महिलांचा निषेधही विसरता येणार नाही. सप्टेंबर २०२२ मध्ये एका महिलेला हिजाब न घातल्यामुळे मारण्यात आले. त्यानंतर तेथील तरुणींनी त्याचा तीव्र निषेध केला. हिजाबविरोधी निषेधादरम्यान, एका मुलीने आपले उघडे केस बांधल्याचा फोटोही व्हायरल झाला. नंतर तिला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. यादरम्यान, जगभरातील सोशल मीडियावर महिलांनी हिजाब जाळताना आणि केस कापतानाचे फोटो दिसले.त्याला आपले सिंहासन सोडावे लागले. फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबच्या माध्यमातून तरुणांनी या चळवळीत एकजूट दाखवली. हे आंदोलन केवळ हिजाबपुरते मर्यादित नव्हते, तर सरकारी हुकूमशाही, धार्मिक कट्टरतावाद आणि महिला स्वातंत्र्याविरुद्धच्या मोठ्या बंडात रूपांतरित झाले. आजही निदर्शने पूर्णपणे संपलेली नाहीत.

जेव्हा चीनमध्ये विद्यार्थ्यांवर टँक चालवण्यात आले (१९८९)-चीनमधील तियानमेन स्क्वेअर हत्याकांडाचा उल्लेख आला की जग अजूनही थरथर कापते. ३ आणि ४ जून १९८९ च्या रात्री, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तियाननमेन स्क्वेअरवरील निदर्शक विद्यार्थ्यांवर टँकने हल्ला केला आणि निदर्शने चिरडून टाकली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. मृतांच्या संख्येचे अंदाज वेगवेगळे आहेत. चीन सरकारने दावा केला आहे की त्या रात्री ३,००० हून अधिक लोक जखमी झाले होते आणि ३६ विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह २०० हून अधिक लोक मारले गेले होते. असे मानले जाते की त्यावेळी चीनच्या कम्युनिस्ट सरकारने लोकशाहीची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर टँक चालवले होते. या दुःखद घटनेत सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला.

बांगलादेशमध्येही विद्यार्थी चळवळ झाली (२०२४) बांगलादेशातील हिंसक विद्यार्थी आंदोलनामुळे ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगचे सरकार उलथवून टाकण्यात आले. बांगलादेशमध्येही भ्रष्टाचारविरोधी चळवळी सुरू झाल्या, जेव्हा हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. बांगलादेशमध्ये आता मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे.

जगाच्या इतिहासात, तत्त्वज्ञानापासून राजकारणात, जगण्याच्या सर्वच क्षेत्रात ही गोष्ट पुन्हा सिध्द झाली आहे, जगात जे जे बदल झाले ते तरूणांनी घडविले आहे. तरुण म्हणजे आपल्याच स्वप्नाच्या दुनियेत रममाण होणारा, मोरपंखी आठवणीत आकंठ बुडालेला एवढच चित्र नाही ,तरुणांनी कीती, चळवळी,लढ्याचे नेतृत्व केली आणि सरकारे उलथवली, मग तो रशियाचा पोलादी पडदा असो, की चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या हुकुमशाहीला आव्हान द्यायला तिआनमेन चौकात सरसावलेले विद्यार्थी असोत हे सगळे तरुणाई करतोय हा इतिहास आहे...

विकास परसराम मेश्राम

मु+पो, झरपडा,ता, अर्जूनी/मोर, जिल्हा गोंदिया

मोबाईल नंबर -7875592800

[email protected]

Updated : 11 Sept 2025 8:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top