Home > Top News > Max Maharashtra Impact : पुण्यातील समाजकल्याण विभागाची वसतीगृह सुरु....

Max Maharashtra Impact : पुण्यातील समाजकल्याण विभागाची वसतीगृह सुरु....

मॅक्स महाराष्ट्राच्या दणक्यानं पुण्यातलं सामाजिक न्याय विभागाचं वसतीगृह विद्यार्थ्यांसाठी खुलं झालं आहे...

Max Maharashtra Impact :  पुण्यातील समाजकल्याण विभागाची वसतीगृह सुरु....
X

राज्यातील अनेक महाविद्यालय प्रत्यक्षात सुरु झाले असताना दरम्यान पुणे शहरात अनेक महाविद्यालय प्रत्यक्षात सुरू झाले आहेत शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात राज्यभरातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात मात्र सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेले पुण्यातील शासकीय वसतीगृह बंद असल्याने या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात परिपत्रक प्रकाशित केले असून सुद्धा पुण्यात मात्र या परिपत्रकाला हरताळ फासले असल्याचा धक्कादायक वास्तव Max Maharashtra ने दाखवलं होतं त्याचबरोबर छात्रभारती व स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्ड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले होते या विद्यार्थ्यांच्या वेदना आणि संघर्ष आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी दाखवली होती. बातमीची दखल घेत प्रशासनाने अखेर पुण्यातील शासकीय वसतिगृह सुरू केले आहेत यामुळे राज्यभरातून पुणे येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.




कोरोनामुळे राज्यातील शिक्षण आणि विद्यार्थी व्यवस्था विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना याची सर्वाधीक झळ बसली होती. अनलॉकच्या प्रक्रीयेत राज्यातील महाविद्यालये टप्प्याटप्यानं सुरु झाली. परंतू सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत सुरु असलेल्या वसतीगृह सुरु करण्यात आली नव्हती. पुण्यातील सामाजिक न्याय विभागाचे होस्टेल कोरोना काळात कोविड रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष म्हणुन वापरण्यात आलं होतं. या वसतीगृहातील स्वच्छतेवरुन स्थानिक महानगरपालिका आणि सामाजिक न्याय विभागाचा वाद होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासन खडबळून जागं झालं.

मॅक्स महाराष्ट्रनं सदर विद्यार्थ्यांच्या समस्या आणि आंदोलनाला वाचा फोडली होती. अखेर प्रशासनानं नमतं घेत सफाई करुन वसतीगृह विद्यार्थ्यांसाठी खुलं केलं आहे. छात्रभारती आणि स्टुडंट हेल्पींग हॅण्ड या आंदोलन करणाऱ्या दोन्ही संघटनांनी Max Maharashra चे आभार मानले आहेत.

Updated : 7 Dec 2021 2:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top