Home > Top News > Puja Khedkar IAS Case : वादग्रस्त पूजा खेडकरला दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Puja Khedkar IAS Case : वादग्रस्त पूजा खेडकरला दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Puja Khedkar IAS Case : वादग्रस्त पूजा खेडकरला दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
X

बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. पूजा खेडकर यांनी कुणाचा खून केलाय का ? असा प्रश्न विचारत न्या.बी.व्ही. नागरत्न आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठानं हा जामीन मंजूर केलाय...

पुणे इथं प्रशिक्षणार्थी IAS म्हणून कार्यरत असतांना पूजा खेडकर यांनी प्रशासनाकडे अवास्तव मागण्या केल्या होत्या. त्यानंतर त्यांच्याविरोधात एकामागून एक आरोपांची राळ उठली...आणि काही दिवसांनी चौकशीअंती पूजा खेडकर यांना कायमस्वरुपी सेवेतून बडतर्फ करण्यात आलं...त्यानंतर त्यांना दिल्ली उच्च न्यायालयानंही जामीन नाकारला...शेवटी, पूजा खेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली...

ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर करुन आरक्षणाचा फायदा घेत आयएएस पद मिळविल्याचा आरोप करण्यात आला होता...पूजा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करतांना तपास यंत्रणांचे कान टोचले...पूजा खेडकरनं कोणता गंभीर गुन्हा केला आहे ? ती ड्रग्ज माफिया आणि दहशतवादी नाही. तिनं कुणाचा खुन केलेला नाही. ती एनडीपीएसची आरोपीही नाही. या सर्व माहितीसाठी तुमच्याकडे एक यंत्रणा किंवा सॉफ्टवेअर असलं पाहिजे. तुम्ही तिची चौकशी पूर्ण करा...तिनं सर्वस्व गमावलंय तिला यापुढे कुठेही नोकरी मिळणार नाही, असंही खंडपीठानं सांगितलं. यावेळी दिल्ली पोलीस केंद्रीय लोकसेवा आयोगानं पूजाच्या अटकपूर्व जामीनाला विरोध केला होता...

आयोगाची परीक्षा देतांना पूजा खेडकर यांनी वेगवेगळ्या नावांचा वापर केला होता, याविषयी मात्र अद्यापही साशंकता आहे. IAS पदी निवड होण्यापूर्वी पूजा या आयआरएस अधिकारी म्हणून कार्यरत होत्या...त्यानंतर त्यांनी पुन्हा आयोगाची परीक्षा दिली, त्यामध्ये पीडब्ल्यूबीडी (मल्टिपल डिसॅबिलिटीज प्रमाणपत्रासह ओबीसीचं नवीन काढलेलं प्रमाणपत्र जोडलं होतं...

Updated : 21 May 2025 2:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top