Home > Top News > जमीन घोटाळ्याप्रकरणी Parth Pawar यांचं नाव घेणं यंत्रणांनी का टाळलं? Sushama Andhare यांचा सवाल

जमीन घोटाळ्याप्रकरणी Parth Pawar यांचं नाव घेणं यंत्रणांनी का टाळलं? Sushama Andhare यांचा सवाल

जमीन घोटाळ्याप्रकरणी Parth Pawar यांचं नाव घेणं यंत्रणांनी का टाळलं? Sushama Andhare यांचा सवाल
X

पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार Parth Pawarयांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कारण याप्रकरणी शिवसेना (UBT) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जमीन प्रकरणातील एक कागदपत्र फेसबुकवर शेअर केलं आहे. त्या कागदपत्रावर पार्थ पवारांनी स्वाक्षरी केल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी म्हटलंय की, पार्थ यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुंद्रांक विभाग आणि पोलीस प्रयत्न करत आहेत का? एकच दस्त ९०१८/२२५ नोंदणीत वापरलेला असताना आणि विशेष म्हणजे जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ पवारांची स्वाक्षरी आहे हे चौकशी अहवालात नमूद असूनही पार्थ पवारांच नाव घेणं यंत्रणांनी का टाळलं ? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत. अमेडा कंपनीच्या भागीदारीत पार्थ पवार यांची १९ टक्के भागीदारी असून दिग्विजय फक्त एक टक्का भागीदार आहेत.परंतु पार्थ यांच्या ऐवजी दिग्विजय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान हे जमीन घोटाळा प्रकरण झी २४ तास या वृत्तवाहिनीने समोर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाची आणखी माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

https://www.maxmaharashtra.com/topnews/parth-pawar-accused-of-land-scam-zee-24-hours-investigation-1436544

Updated : 7 Nov 2025 9:44 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top