BMC Election 2026 Mayor : भाजपा महापौर उमेदवार मोहित कंबोज ?
X
BMC Election 2026 सध्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागला असून यंदाची निवडणुक मराठी भाषिकांची आणि Mumbai मुंबईच्या अस्तित्वाची मानली जात आहे. त्यात सर्वात श्रीमंत असलेल्या महानगरपालिकेवर महापौर मराठी की अमराठी बसणार ? यावरून चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान BMC Election 2026 Mayor भाजपाचा मुंबई महापौर उमेदवार ‘मोहित कंबोज’ Mohit Kamboj ? मराठी अस्मितेवर पुन्हा प्रश्नचिन्ह ! मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) पुढील महापौर निवडीवरून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे समर्थक आणि कार्यकर्ते यावेळी पुन्हा एकदा ‘मुंबईचा महापौर मराठीच होणार का?’ असा प्रश्न उपस्थित करत आहेत.शिवसेना (UBT) समर्थक अखिल चित्रे यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केली आहे .
काय म्हणतात अखिल चित्रे
भाजपाने आतापर्यंत मुंबईत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल यांसारख्या अमराठी नेत्यांना उपमहापौरपद दिले आहे. याच पार्श्वभूमीवर आता २०२६ मध्ये होणाऱ्या BMC निवडणुकीत महापौरपदासाठी मोहित कंबोज हे नाव अंतिम ठरलं असल्याचा दावा केला जात आहे. कंबोज हे मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष असून, त्यांचा मूळ गाव पंजाबमधील आहे. त्यांच्या निवडीवरून मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते किरीट सोमय्या, आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की,
“महापौर महायुतीचाच होणार…”
“महापौर हिंदू होणार…” पण कोणीही स्पष्टपणे “महापौर मराठीच होणार” असं वक्तव्य केलेलं नाही, असा आरोप मराठी माणसाच्या भावनांना धक्का देणारा आहे अशी टीका होत आहे. अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,
“मराठी माणसा, आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का?
धनाढ्य आहे म्हणून महायुतीची हुजरी असेल, पण स्वाभिमानी मराठी माणसाने अशांना हिसका दाखवावा!”यावरून आता मुंबईच्या मराठी मतदारांमध्ये संभ्रम आणि संतापाची भावना निर्माण होत असल्याचं दिसतंय.
भाजपाने मुंबईत आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असले अमराठी उपमहापौर दिले... त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजपा नेत्यांना विचारतात कि, "मुंबईचा महापौर मराठी असेल का?" त्यावर फडणवीस म्हणतात, "महापौर महायुतीचाच होणार..."
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) December 21, 2025
शेलार म्हणतात, "महापौर हिंदू होणार..."
पण कुणीही छातीठोकपणे… pic.twitter.com/HQs9iMijg5
BMC महापौरपदाची निवडणूक आता फक्त महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील लढाई न राहता, मुंबईच्या मराठी अस्मितेच्या लढाईतही बदलली आहे का? हे पाहणं आता रंजक ठरणार आहे.
आजवर मुंबईला सर्वसामान्य कुटुंबातून येणारे असे २३ महापौर लाभले आहेत.
मुंबईत बहुभाषिक लोकं राहत असून रोजगारासाठी अनेक लोक स्थलांतरित होत असतात. सध्या मुंबईत मराठी भाषिकांची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३५-४२ टक्के आहे. आर्थिक राजधानी मुंबईवर कोणाची सत्ता येणार आणि कोण महापौर होणार हे आगामी निवडणुकांतून लवकरच समोर येईल.






