Home > Top News > महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर!

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर!

मुंबई महानगरपालिकेचा महापौर खुल्या प्रवर्गातील महिला होणार

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर!
X

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर आज (२२ जानेवारी २०२६) मंत्रालयात पार पडलेल्या आरक्षण सोडतीनुसार महापौरपदाचे प्रवर्ग निश्चित झाले आहेत.नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली.यानुसार, १७ महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गात,८ मध्ये ओबीसी,३ मध्ये अनुसूचित जाती आणि १ मध्ये अनुसूचित जमाती साठी महापौरपद आरक्षित झाले आहे.तसेच, १५ महापालिकांमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे.

आरक्षणाचे गणित

अनुसूचित जमाती (एसटी) – १

अनुसूचित जाती (एससी) – ३

ओबीसी – ८

खुला (सर्वसाधारण) प्रवर्ग – १७

प्रमुख महापालिकांमध्ये महापौर कोणत्या प्रवर्गाचा?

नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)

कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती (एसटी)

ठाणे – अनुसूचित जाती (एससी)

मुंबई (बीएमसी) – खुला प्रवर्ग (महिला)

पुणे – खुला प्रवर्ग

पिंपरी-चिंचवड – खुला प्रवर्ग

नाशिक – खुला प्रवर्ग

नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)

छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग (महिला)

जालना – अनुसूचित जाती (महिला)

लातूर – अनुसूचित जाती (महिला)

इचलकरंजी – ओबीसी

पनवेल – ओबीसी

अहिल्यानगर – ओबीसी (महिला)

अकोला – ओबीसी (महिला)

उल्हासनगर – ओबीसी

कोल्हापूर – ओबीसी

चंद्रपूर – ओबीसी (महिला)

जळगाव – ओबीसी (महिला)

भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग

मालेगाव – खुला प्रवर्ग

मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग

नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग (महिला)

परभणी – खुला प्रवर्ग

सांगली-मिरज – खुला प्रवर्ग

वसई-विरार – खुला प्रवर्ग

सोलापूर – खुला प्रवर्ग

धुळे – खुला प्रवर्ग (महिला)

अमरावती – खुला प्रवर्ग (महिला)

या आरक्षणानंतर आता प्रत्येक महापालिकेत महापौर निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. खुल्या प्रवर्गातील महापालिकांमध्ये सत्ताधारी पक्षांची स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे, तर आरक्षित प्रवर्गातील महापालिकांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

Updated : 22 Jan 2026 12:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top