Home > Top News > लॉकडाऊन' की 'कडक निर्बंध'?:राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

लॉकडाऊन' की 'कडक निर्बंध'?:राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

चोवीस तासात पन्नास हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण आढळून आल्याने राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

लॉकडाऊन की कडक निर्बंध?:राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक
X

आज दुपारी 3 वाजता राज्यमंत्रीमंडळाची बैठक सुरु झाली असून सर्व मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित आहेत. कोविड स्थितीवरील सादरीकरण आणि महत्वाचे निर्णय या बैठकीत होणार आहेत. 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. आज मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यसरकार गर्दीच्या सर्व ठिकाणांवर बंदी घालण्याचा विचारात असून ही बंद आहे ठराविक कालावधीसाठी सुरुवातीला असेल.त्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन बंदी दीर्घकाळापर्यंत सुरू ठेवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.मुख्यत्वे शॉपिंग मॉल, पब,बार, धार्मिक स्थळं आणि साप्ताहिक बाजाराची ठिकाणं या ठिकाणी गर्दी अधिक होते त्या ठिकाणांवर ही बंदी लागू असणार आहे..

पहा या विषयावरचे मॅक्स महाराष्ट्रचे लाईव...

लॉकडाऊन' की 'कडक निर्बंध'?

Updated : 4 April 2021 9:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top