केळी भावाची ऐतिहासिक घसरणं शेतकरी संकटात
केळीच्या दरात ऐतिहासिक घसरण : व्यापारी लॉबी कारणीभूत?
X
केळीला उचांकी भाव मिळत असतांना आता मात्र नेमकं सणासुदीचाच्या काळात केळीचे भाव ऐतिहासिक घसरणं झाली आहॆ. गेल्या महिन्यात 1500 ते 2000 पर्यंत भाव केळीला मिळत असतांना सध्या केळीला केवळ 400 ते 600 रुपये प्रती क्विंटल असा दर मिळत आहे. हा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.व्यापाऱ्यांनी लॉबी करून भाव पाडले असल्याचा आरोप काही केळी उत्पादक शेतकरी करत आहॆ.
कापणी योग्य केळी झाली तरी व्यापारी येत नाही यामुळे शेतातच केळी पिकण्याच्या भीतीपोटी कमी भावात शेतकऱ्यांकडून व्यापारी केळी खरेदी करत आहॆ. यामुळे शेतकऱ्यांचा गैरफायदा व्यापारी उठवत असल्याच चित्र आहॆ. व्यापारी मात्र या वर्षीच्या दर घटतीचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्याच सांगत आहॆ. तर काहींच्या म्हणण्यानुसार सद्या मागणी कमी आहॆ. वाहतुकीचे अडथळे किंवा मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने वाढला परंतु कुठलेही ठोस कारण सध्या समोर आलेले नाही. काही ठिकाणी तर केळी खरेदीसाठी व्यापारी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. आहॆ त्या भावात केळी देण्यास नाईलाजास्तव शेतकरी केळी देण्यास तयार होत आहॆ. केळीचा दर क्विंटलमागे किमान 400 रुपयांचा खर्च येतो. पण सध्या गेल्यावर्षी उशिरा लागवड झालेल्या व नुकतेच कापणीस आलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होत आहे.
व्यापाऱ्यांची मनमानी, केळी उत्पादक अडचणीत
जिल्ह्यात केळी फळबागासाठी प्रसिद्ध असलेल्या रावेर यावल चोपडा मुक्ताईनगर चाळीसगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून केळीच्या दराची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
केळीला हमी भाव द्यावा अनेक वर्षांची मागणी :
केळीच्या लागवडीपासून
कापणी पर्यंत एकरी एक लाख रुपये पर्यंत खर्च येतो. मात्र केळीची पूर्ण बाग तयार असून व्यापारी घ्यायला तयार नसल्याने शेतात पडून आहे. केलेला खर्च ही निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहॆ. शेतकऱ्यांच नुकसान टाळण्यासाठी केळी हमी भाव द्यावा अशी अनेक वर्षपासूनची मागणी आजही कायम आहॆ मात्र केळी हमी भावाची कोणतीही ठोस भूमिका सरकारने घेतली नाही.