Home > Top News > #BipinRawat २० मिनिटात हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला : संरक्षणमंत्री

#BipinRawat २० मिनिटात हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला : संरक्षणमंत्री

देशाला हादरवणाऱ्या हेलिकॉप्टर अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत कथन केला.

#BipinRawat २० मिनिटात हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला : संरक्षणमंत्री
X


देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं काल तामिळनाडूच्या कुन्नूर परिसरात हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी अंत झाला. अपघातात बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण १३ जणांचं दुर्दैवी निधन झालं असून एक गंभीर जखमी आहे. आज सर्व पार्थिव नवीदिल्लीत आणले जाणरा असून या अपघाताविषयी आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत निवेदन दिलं.

राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, सीडीएस रावत दिल्लीतून सकाळी निघून कोईमतूरमधे पोचले होते. तेथून पुढे हेलिकॉप्टरचा उड्डाण कालावधी अवघा २७ मिनिटांचा होता. ११ वाजून ४८ मिनिटांनी हेलिकॉप्टरनं एअरबेसवरून उड्डाण घेतलं. हे हेलिकॉप्टर १२ वाजून १५ मिनिटांनी वेलिंग्टन येथे पोहोणं अपेक्षित होतं. पण सुलुल एअरबेसचा १२ वाजून ८ मिनिटांनी अर्थात उड्डाण घेतल्यानंतर २० मिनिटांनी हेलिकॉप्टरसोबत संपर्क तुटला, असं राजनाथ सिंह म्हणाले.

जंगलात काही स्थानिक लोकांना आग लागल्याचं दिसलं. ते धावत तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना एका लष्करी हेलिकॉप्टरचे अवशेष आगीत जळत असलेले दिसले. बचाव पथकानं लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. जितक्या लोकांना वाचवणं शक्य होतं, त्यानंतर वेलिंग्टनच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. या अपघातात १४ पैकी १३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

या अपघाताचा तपास करण्यासाठी हवाई दलामार्फत चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. "एअर चीफ मार्शल यांनी घटनास्थळी आणि वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. इंडियन एअरफोर्सकडून एअर मार्शल मानिंदरसिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास पथकानं कालच वेलिंग्टनला पोहोचून आपलं काम सुरू केलं आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि इतर सर्व सहकाऱ्यांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील", असं राजनाथ सिंह यांनी लोकसभेत स्पष्ट केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अपघाती घटनेबद्दल शोक व्यक्त करत प्रस्ताव ठेवला. त्यानंतर सर्व लोकसभा सदस्यांनी मृतांना आदरांजली वाहीली.

दरम्यान हॅलिकॉप्टर दुर्घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे...

Updated : 9 Dec 2021 6:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top