Home > Top News > छगन भुजबळ ठरले सरकारमधील सर्वात ज्येष्ठ मंत्री | Chhagan Bhujbal

छगन भुजबळ ठरले सरकारमधील सर्वात ज्येष्ठ मंत्री | Chhagan Bhujbal

छगन भुजबळ ठरले सरकारमधील सर्वात ज्येष्ठ मंत्री | Chhagan Bhujbal
X

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि. २० मे) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांना राज्याच्या मंत्री पदाची शपथ दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी छगन भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आतापर्यंत गणेश नाईक हेच सर्वात ज्येष्ठ मंत्री होते. नाईक सध्या ७४ वर्षांचे आहेत. त्यांच्या तुलनेत कुणीही ज्येष्ठ म्हणून मंत्रिमंडळात नव्हतं. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं ते आता या सरकारमधील सर्वात ज्येष्ठ मंत्री ठरले आहेत...भुजबळ सध्या ७७ वर्षांचे आहेत...

शपथविधी सोहळ्याला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्यमंत्रिमंडळातील सदस्य दादाजी भुसे, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा, संजय राठोड, अशोक उईके, उदय सामंत, संजय शिरसाट, संजय राठोड व दत्तात्रय भरणे, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, शासनाचे वरिष्ठ अधिकारी व भुजबळ यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली. त्यानंतर राज्यपालांनी भुजबळ यांना शपथ दिली. शपथविधी नंतर राज्यपालांनी भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Updated : 20 May 2025 12:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top