सावधान! जोरदार पाऊस: ह्या जिल्ह्यांना IMD चा अलर्ट..
X
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रासह देशात सुरुवातीला पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दीला आहॆ. यात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्याना हायअलर्ट दीला आहॆ.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 जुलै पासून ते 4 जुलै ह चार दिवस राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आले असून कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे तसेच उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पावसाचे तीव्र अलर्ट देण्यात आले आहेत. मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
IMD चा ह्या जिल्ह्यांना अलर्ट -
संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा येलो अलर्ट असून रायगड ठाण्यातही येलो अलर्ट आहे. पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरातही जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट असून वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुरातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय.