Home > News Update > होय मी जय भीमवाली - अभिनेत्री चिन्मयी सुमित

होय मी जय भीमवाली - अभिनेत्री चिन्मयी सुमित

होय मी जय भीमवाली - अभिनेत्री चिन्मयी सुमित
X

सध्या सोशल मीडियावर एकच वाक्याची चर्चा सुरु आहे ती म्हणजे “होय मी जय भीमवाली आहे.” नुकतेच अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १३ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात अभिनेत्री चिन्मय सुमीत यांनी मी जयभीम का बोलते यामागील अर्थ स्पष्टपणे समजावून सांगितला आहे त्या म्हणतात,

"मला खूप लोक विचारतात की तुम्ही जयभीम वाले आहात का? मला अनेकदा नमस्कार करतात तेव्हा मी 'जयभीम' म्हणते. तर हो मी जयभीम आहे, मी आंबेडकरांची आहे. वेगवेगळ्या लोकांचे फॅन असतात तशी मी आंबेडकरांची फॅन आहे. आपण सगळ्यांनी जयभीम म्हटलं पाहिजे कारण आपण जनवादी संघटनेच्या कार्यकर्त्या आहोत. जनवादी म्हणजे लोकशाही आणि माणूस म्हणून आपल्याला दर्जा आहे असं मानून महिला संघटना चालवणारे लोक, समानतेवर आधारित समाज असावा असं स्वप्न पाहणारे लोक किंवा महिला या प्रथम माणूस आहेत याची आठवण करून देणारी ही संघटना आहे . त्यामुळे मला वाटतं की आपल्या सर्वांना माणसाचा दर्जा जो दिला तो आपल्या राज्यघटनेने आणि त्या राज्यघटनेचे घटनाकार म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांप्रतीची कृतज्ञता ही माझ्या आयुष्यात माझ्या प्रत्येक नमस्कारनंतर व्यक्त व्हावी म्हणून मी नेहमी जय भीम म्हणते."

तसेच जेव्हा संघर्ष संपतो तेव्हा रचनावादी काम करावं लागतं जे आमच्या पिढीने केलं नाही. सध्याच्या काळाची परिस्थिती पाहता पुन्हा आपली पिछेहाट होत चालली आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. अनेक वर्षांपासून आपल्या अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान मिळवलं आहे. मालिका, चित्रपट, नाटकांमधील त्यांची कामगिरी उत्तम आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या मुद्द्यांवर किंवा घटनांवर त्या स्पष्टपणे व्यक्त होत असतात.

Updated : 11 Nov 2025 12:44 PM IST
Next Story
Share it
Top