Home > News Update > बीडची ज्ञानराधा बँक का बुडाली मग सर्वसामान्यांचे पैसे मिळणार का...?

बीडची ज्ञानराधा बँक का बुडाली मग सर्वसामान्यांचे पैसे मिळणार का...?

बीडची ज्ञानराधा बँक का बुडाली मग सर्वसामान्यांचे पैसे मिळणार का...?

बीडची ज्ञानराधा बँक का बुडाली मग सर्वसामान्यांचे पैसे मिळणार का...?
X

बीड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात पाच ते सहा मल्टीस्टेट बँका व क्रेडिट सोसायटी पळून गेल्या आहेत यामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट, जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट, शुभमंगल मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, साई राम अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बँका बीड जिल्ह्यातील नागरिकांचे करोडो रुपये घेऊन पळून गेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे हे पैसे मिळतील का हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट ही बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी मल्टीस्टेट म्हणून ओळखली जाते, तब्बल 52 शाखा असलेली ही मल्टीस्टेट सर्वसामान्यांचे पैसे घेऊन पळून गेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक भागात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असून, काल पुणे येथे त्यांना अटक करण्यात आली त्यावेळी त्यांचा एक सहकारी व सुरेश कुटे यांना अटक केली मात्र अर्चना कुटे यांना अटक केली नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आता पैसे मिळणार का? हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. याविषयी जेष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत रुईकर यांनी बँकांच्या या घोटाळेबाजीवर सविस्तर विश्लेषण केले आहे बघा फक्त मॅक्स महाराष्ट्रावर

Updated : 8 Jun 2024 1:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top