National Pollution Control Day 2025 : भोपाळमध्ये काय घडलं होतं?
X
आज २ डिसेंबर अर्थात National Pollution Control Day राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. संपूर्ण जगापुढे प्रदूषणाचे भीषण आव्हान उभे आहे. २०२५ मध्ये सर्व जगाने निर्सगाचा प्रकोप पाहिला अनेकांनी आपले प्राण गमवावे लागले तर अनेकांना नुकसानीला सामोरं जावं लागलं. वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. तसेच २ डिसेंबर १९८४ साली भोपाळ वायू दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. ज्यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.
भोपाळ वायू दुर्घटना Bhopal gas tragedy
Union Carbide Disaster युनियन कार्बाइड आपत्ती म्हणजे भोपाळ वायू दुर्घटना. २ डिसेंबर १९८४ च्या रात्री भोपाळमधील युनियन कार्बाइड इंडियाच्या कीटकनाशक कारखान्यातून ४० टनांहून अधिक मिथाइल आयसोसायनेट (MIC) या अत्यंत विषारी वायूची गळती झाली, ज्यामुळे भोपाळ शहर एका प्राणघातक धुक्यात अडकले ज्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले सरकारी अंदाजानुसार, गॅस गळतीच्या काही दिवसांत सुमारे ३,५०० लोकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतरच्या काळात १५,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला ४१ वर्ष पूर्ण झाली आहे.
बदलत्या हवामानाकडे लक्ष देत वायू प्रदूषणाचे गंभीर धोके आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या दिवशी लोकांना प्रदूषण कमी करण्याचे महत्त्व आणि त्याच्या धोक्यांबद्दल जागरूक केले जाते.






