Home > News Update > …अन्यथा आपल्या विरुद्ध पक्षशिस्त भंगाची कारवाई करु, Rupali Thombare Patil यांना पक्षातून कारणे दाखवा नोटीस

…अन्यथा आपल्या विरुद्ध पक्षशिस्त भंगाची कारवाई करु, Rupali Thombare Patil यांना पक्षातून कारणे दाखवा नोटीस

महिला आयोग अध्यक्ष Rupali chakankar यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी Rupali Thombare Patil यांना पक्षातून नोटीस

…अन्यथा आपल्या विरुद्ध पक्षशिस्त भंगाची कारवाई करु, Rupali Thombare Patil यांना पक्षातून कारणे दाखवा नोटीस
X

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या NCP प्रवक्त्या अॅड. रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान रुपाली ठोंबरे यांनी ही नोटीस फेसबुकवर शेअर केली असून यात “आपणास राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे. म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे ७ दिवसांच्या आत करावा अन्यथा आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.” असं या नोटीस मध्ये म्हटलं आहे.

तर या कारणे दाखवा नोटीसबाबत रुपाली ठोंबरे पाटील फेसबुकवर लिहितात की, आज रात्री पक्षाकडून जगातील महिलांना न्याय देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी खुलासा मागण्यात आलेला आहे. खरं तर खुलासा देण्याची वेळ ७ दिवस अत्यंत कमी वेळ देण्यात आली आहे. मी वैयक्तिक हितसंबध ते हगवणे प्रकरण ते आमच्या भगिनी कैलासवाशी डॉक्टर संपदा मुंडेंच्या चारित्र्यहनन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा देण्यात येईल. ज्यांनी मयत भगिनीचे चारित्र्यहनन केले त्याच्या विषयी खरतर काय खुलासा द्यावा?


यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील महिलांचा पक्षातंर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Updated : 8 Nov 2025 8:45 AM IST
Next Story
Share it
Top