Home > News Update > वरणगाव विकास कॉलनीचा जलकुंभ कोसळण्याच्या मार्गावर

वरणगाव विकास कॉलनीचा जलकुंभ कोसळण्याच्या मार्गावर

वरणगाव येथे पाण्याच्या टाकी जवळ खोदकाम केल्याने जलकुंभ कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधित आडमुठ्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वरणगाव विकास कॉलनीचा जलकुंभ कोसळण्याच्या मार्गावर
X

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे नविन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत विकास कॉलनीतील जलकुंभाच्या पायाशी जलकुंभाकरिता ठेकेदाराने खोदकाम केल्याने जुना जलकुंभ कोसळण्याच्या मार्गावर आहे.




ठेकेदाराने केलेल्या खोदकामात पावसाचे आणि इतर पाणी साचत असल्याने जुन्या जलकुंभाचा पाया कमकुवत झाला आहे.हा जलकुंभ भर वस्तीत असल्याने येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे याबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

संबंधित आडमुठ्या ठेकेदारावर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे.

Updated : 28 July 2021 1:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top