Dharmendra passes away : अष्टपैलू अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन
X
बॉलिवूडचा (Bollywood) 'ही-मॅन' (He Man) सुपरस्टार, अष्टपैलू अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांना साधारणतः बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून ते घरीच होते. पण, अखेर त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांनी इंस्टाग्रामवर एक युगाचा अंत असं लिहित धर्मेंद्र यांचा फोटो शेअर केला आहे.
दरम्यान विले पार्ले येथील स्मशान भूमीत त्यांचं अंत्यसंस्कार केलं जाणार असल्यामुळे सिनेसृष्टीतील दिग्गज लाकार या ठिकाणी येत आहेत. धर्मेंद्र यांच्या जाण्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.






