कोरोनाच्या संदर्भातील माहिती दररोज अपडेट करा: डॉ. दीपक म्हैसेकर

8

कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्याबरोबरच आपापल्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भविष्यकालीन उपाययोजनेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेने दररोज अचूक माहिती अद्यावत करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

कोरोना विषाणूबाबत विभागीय आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात दृकश्राव्य संवाद प्रणालीद्वारे पार पडली.
यावेळी म्हैसेकर म्हणाले, संबंधित यंत्रणेनी आपापल्या जिल्ह्यातील बाधित रुग्ण, सक्रीय रुग्ण, गंभीर रुग्ण, बरे झालेले रुग्णण, कोमोर्बिडिटी रुग्ण, मृत्यू झालेले रुग्ण तसेच शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील खाटा, पीपीई किट, व्हेंटीलेटर, ऑक्सीजनयुक्त खाटांची संख्या इत्यादी नोंदी दैनंदिन अद्यावयत कराव्यात, मृत्यदर शुन्यावर आणण्यासाठी जे जे शक्य होईल अशा सर्व आवश्यक त्या उपाययोजना करा.

हे ही वाचा

कोरोनाच्या रुग्णांना उपचारासोबत समुपदेशनाची गरज आहे का?
गृहनिर्माण सोसायट्यांना सहकारमंत्र्यांनी केल्या ‘या’ सूचना

 

कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यूदर कमी करण्यासाठी संबधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून एकत्रित नियोजन करावे, कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण का वाढत आहे यांचा बारकाईने अभ्यास करुन परिस्थिती नियत्रंणात आणावी, प्रतिबंधित क्षेत्रातील परिस्थिती प्राधान्याने हाताळा, मान्सूनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यानुसार तयारी करा, ग्रामीण तसेच नागरी भागात जास्तीत सर्व्हेक्षण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करा.

मागील 24 तासात किती रुग्ण वाढले यांचा विचार करुन नियोजन करा, खासगी रुग्णालयातील खाटा, पीपीई किट, व्हेंटीलेटर,ऑक्सीजनयुक्त खाटा इत्यादी बाबी विचारात घ्याव्यात, कोरोना विषाणूचे तात्काळ निदान करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.
बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील कोरोना‍ विषाणूच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली. त्याच बरोबर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात करीत असलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली.

Comments