Home > News Update > जे देशाचं आहे ते विकून टाकायचं आणि दुसऱ्याचं आहे ते चोरायचं, उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्र

जे देशाचं आहे ते विकून टाकायचं आणि दुसऱ्याचं आहे ते चोरायचं, उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्र

जे देशाचं आहे ते विकून टाकायचं आणि दुसऱ्याचं आहे ते चोरायचं, उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्र
X

मोदी सरकारने (Modi Government) गेल्या काही वर्षांमध्ये देशाची संपत्ती विकण्याचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे दुसरे पक्ष फोडले जात आहे. त्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अमरावती (amravati)

येथे बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. दुसरीकडे मोदी सरकारकडे निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास राहिला नाही. त्यामुळे मोदी सरकार इतरांची घरं आणि पक्ष फोडत आहे .

मोदी सरकारने देशातील( LIC )विकली, रस्ते विकले, रेल्वे स्टेशन आणि विमानतळ याबरोबरच एअर इंडिया यासारखी कंपनी विकली. त्यावरून उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदी सरकार एकीकडे देशाचं जे आहे ते विकून टाकतंय तर दुसरीकड़े दुसऱ्यांचं आहे ते चोरून नेत आहे.


उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील इतर महत्वाचे मुद्दे-

१) मी मतांची भीक मागायला आलो आहे. कारण मी मतदाराला राजा मानतो

२) मी घरी बसून काम केलं ते तुम्हाला घरं फोडूनही करता येत नाही- उद्धव ठाकरे

३) मेळघाटात कुपोषण पण अजून पर्यंत कोण मंत्री तिकडे गेला आहे- उद्धव ठाकरे

४) सत्ता नसताना आम्ही कुपोषणाविरोधात काम केलं. आता तुमच्याकडे खोके आहेत. त्या खोक्यातून माणसं वाचवा ना- उद्धव ठाकरे

५) जे देशाचं आहे ते विकून टाकायचं आणि दुसऱ्याचं आहे ते चोरून घ्यायचं ही वेळ भाजपवर का आली? -उद्धव ठाकरे

६) भाजपला सत्तेची मस्ती आलीय. पण आत्मविश्वास नाही- उद्धव ठाकरे

७) जर मर्दाची औलाद असेल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेऊन मैदानात या, उद्धव ठाकरे यांचे आव्हान

८) तुम्ही शुन्य असतानाही ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं. त्यांचीच शिवसेना संपवली, हे हिंदूत्व आहे का?

९) 70 हजार कोटींचा आरोप करणारे यांच्या मांडीला लावून बसले आहेत- उद्धव ठाकरे

१०) ज्यांच्यावर आरोप झाले त्यांच्यावर गोमूत्र शिंपडत आहात का?

११) मुंबई महापालिकेत घोटाळा शोधायचा असेल तर देशातील प्रत्येक महापालिकेत घोटाळा शोधा, पीएम केअर्सचाही घोटाळा शोधा- उद्धव ठाकरे

१२) पंतप्रधान मोदी यांना मत दिलं आणि फुकट गेलं- उद्धव ठाकरे

१३) तुम्ही टपरी पे चर्चा, सलून मध्ये चर्चा, बसमध्ये चर्चा, पानाच्या ठेल्यावर चर्चा ही चर्चा आता तुम्ही केली पाहिजे- उद्धव ठाकरे

१४) मुँह मे राम आणि बगल में छुरा हे आमचं हिंदूत्व नाही- उद्धव ठाकरे

१५) भाजपच्या कार्यकर्त्यांचं कुपोषण होतंय- उद्धव ठाकरे

१६) भ्रष्ट तेतुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा- उद्धव ठाकरे

१७) भाजप टाकत असलेली पाऊलखूण धोकादायक- उद्धव ठाकरे

१८) तुम्ही आमचे शेंडे बुडखे नेले पण जमीन आमची आहे- उद्धव ठाकरे

Updated : 10 July 2023 9:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top