Home > News Update > हिंमत असेल तर आज निवडणुका घेऊन दाखवा - आ. यशोमती ठाकूर

हिंमत असेल तर आज निवडणुका घेऊन दाखवा - आ. यशोमती ठाकूर

हिंमत असेल तर आज निवडणुका घेऊन दाखवा - आ. यशोमती ठाकूर
X

राज्यात अजित पवार यांचा गट शिंदे फडणवीस सरकारसोबत गेल्याने माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी संतापजन व्यक्त केला. जमत असेल तर उद्या निवडणूका घेऊन दाखवा. लोकसभेच्या निवडणूका घेऊन दाखवा, आम्ही तयार आहोत, असं म्हणत आमदार यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारला आव्हान दिले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी काँग्रेसच्या आमदार, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी भेट घेतली. स्वागताची अमरावतीची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या कि "अमरावतीत काँगेसचे प्रभुत्व जास्त आहे त्यामुळे काँग्रेस अमरावती लोकसभा लढविण्याचा आग्रह असल्याचं सांगितल आहे. यावेळी ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं आहे. "हिंमत असेल तर आज निवडणूका घेऊन दाखवा. आम्ही तयार आहोत, असं म्हणत आमदार यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारला आव्हान दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्याची मागणी त्यांनी केली आहे तर होणाऱ्या निवडणुकीत कोणाची ताकद किती दाखवून देऊ असा टोला ही त्यांनी लगावला आहे.

Updated : 10 July 2023 7:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top