Home > News Update > भारतात 2 प्रकारचे दहशतवाद, सुशिक्षित व्यक्ती का दहशतवादाकडे वळतायेत? - पी. चिदंबरम

भारतात 2 प्रकारचे दहशतवाद, सुशिक्षित व्यक्ती का दहशतवादाकडे वळतायेत? - पी. चिदंबरम

भारतात 2 प्रकारचे दहशतवाद, सुशिक्षित व्यक्ती का दहशतवादाकडे वळतायेत? - पी. चिदंबरम
X

10 नोव्हेंबर (सोमवारी) देशाच्या राजधानी दिल्लीत Delhi Bomb blast metro स्टेशनजवळ एका कारमध्ये बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की या दुर्घटनेत 12 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. हा स्फोट होण्यापूर्वी 3 डॉक्टरांसोबत 8 जणांना आणि 2,900 किलोग्राम स्फोटकं जप्त करण्यात आली होती.

दरम्यान देशात वाढते हल्ले पाहता माजी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पुन्हा एकदा स्थानिक दहशवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतात होणारे हल्ले यावर त्यांनी म्हटलं आहे की, भारताला दोन प्रकारच्या दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. तसेच अशा कोणत्या परिस्थिती आहेत जे सुशिक्षित व्यक्तींनाही दहशतवादाकडे घेऊन जात आहे. नेमकं काय म्हटलंय पाहुयात..

https://x.com/pchidambaram_in/status/1988608026786586782?s=48&t=2Xznuip1KV1MMpo5k2O5dg

पी.चिदंबरम एक्सवर म्हणतात की,

पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी आणि हल्ल्यानंतरही मी असे म्हटलं होतं की दोन प्रकारचे दहशतवादी असतात. परदेशी प्रशिक्षित घुसखोर दहशतवादी आणि स्थानिक दहशतवादी. संसदेतही ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान मी असं म्हटले होतं. तेव्हा स्थानिक दहशतवाद्यांच्या संदर्भात माझी खिल्ली उडवण्यात आली आणि मला ट्रोल करण्यात आले. परंतु, मी हे सांगायलाच हवे की सरकारने गुप्तपणे मौन पाळले कारण सरकारला माहित आहे की देशात स्थानिक दहशतवाद देखील आहेत. या ट्विटचा मुद्दा असा आहे की आपण स्वतःला विचारले पाहिजे की, अखेर भारतीय नागरिकांना अगदी सुशिक्षित व्यक्तींनाही दहशतवादी बनवणाऱ्या परिस्थिती कोणत्या आहेत?

Updated : 13 Nov 2025 10:51 AM IST
Next Story
Share it
Top