अशोक आंबेकर यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण वातावरणात आदरांजली
‘बाबा’ स्मरणिकेचं प्रकाशन
X
मुंबई : स्थानिय लोकाधिकार समितीचे माजी कार्याध्यक्ष तथा चेंबूर इथल्या आनंदी जेष्ठ नागरिक कट्ट्याचे अग्रणी दिवंगत अशोक आंबेकर यांना आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण वातावरणात आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्यावर आधारित स्मरणिकेचंही प्रकाशन करण्यात आलं.
५ ऑगस्ट २०२४ रोजी अल्पशा आजारानं वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांचं निधन झालं होतं. खादी ग्रामोद्योग मधून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी सामाजिक कार्य सुरुच ठेवलं होतं. त्याचाच एक भाग म्हणजे आनंदी ज्येष्ठ नागरिक कट्टा होता. या कट्ट्याच्या माध्यमातूनही ते शेवटपर्यंत कार्यरत होते. यावेळी या कट्ट्यावरील तसेच खादी ग्रामोद्योगमधील त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी आंबेकर कुटुंबियांचे मित्र, नातेवाईक, स्नेही यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये शिवसंग्राम च्या अध्यक्षा डॉ. ज्योती विनायक मेटे, उज्ज्वला हावरे, अमरावतीचे डॉ. राजू ठाकूर, मनसेचे सरचिटणीस कर्ण दुनबळे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. माई देशमुख, ज्येष्ठ पत्रकार तुळसीदार भोईटे, व्याख्याते जगदीश ओहोळ, जयंत वाणी, रामचंद्र पवार, महादेव महाडिक, दत्तात्रय पाटणे, सुरेश घाग, जयवंत घाग, आनंदी कट्ट्याचे अध्यक्ष अप्पा येरागी, कट्ट्याचे सचिव मन्साराम खैरनार, महेंद्र कांबळे, सचिव, आंबेडकरी विचारधारा, अंधश्रद्धा निर्मूलन चे ज्ञानेश मावळे, आनंदी कट्ट्याचे सदस्य शांतीकुमार शहा, ज्येष्ठ पत्रकार सुरेश ठमके यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते. या आदरांजली सभेचं सूत्रसंचालन नागसेन निकम यांनी केले.
मॅक्स महाराष्ट्रचे संस्थापक, संपादक रविंद्र आंबेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष आंबेकर आणि आर्या बुगडे यांच्या यशस्वी वाटचालीत अशोक आंबेकर यांच्या संस्काराचा मोठा वाटा असल्याचं मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केलं. अशोक आंबेकर यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या मुलांप्रमाणेच नातीही पुढं नेत असल्याबद्दलही यावेळी समाधान व्यक्त करण्यात आलं.
‘बाबा’ स्मरणिकेचं प्रकाशन
दिवंगत अशोक आंबेकर यांच्या जीवनावर आधारित ‘बाबा’ या स्मरणिकेचं प्रकाशन यावेळी त्यांच्या पत्नी श्रीमती संगीता यांच्या हस्ते करण्यात आलं. दिवंगत अशोक आंबेकर यांच्या मित्रपरिवारातील खादी ग्रामोद्योगचे प्रवीण शिवलकर, आनंदी कट्ट्याचे अप्पा येरागी, अंनिसचे ज्ञानेश मावळे, कट्ट्याचे चंद्रकांत वरघडे, स्थानिय लोकाधिकार समितीचे दिनेश पाटोळे, कट्ट्याचे नागसेन निकम, जयवंत घाग, माजी सरपंच महेश पाटोळे, लोकाधिकार समितीचे प्रकाश पडवळ, बालपणीचे मित्र सुरेश घाग, जयवंत देसाई, सुनंदा हरिश्चंद्र गायकवाड, उदय सावंत यांच्यासह कुटुंबातील ज्येष्ठ सुपूत्र संतोष आंबेकर, कन्या सौ. आर्या बुगडे, नाती मल्लिका आंबेकर, सानिका आंबेकर, नात प्रिन्सेसा बुगडे यांनीही स्मरणिकेत आपल्या भावना व्यक्त केल्या.