अंधश्रद्धेविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी ठाण्यात, २५ डिसेंबर रोजी ‘चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण शिबीर’
To cultivate a scientific outlook against superstition, a 'Miracle Presentation Training Camp' will be held in Thane on December 25th.
X
ठाणे ౹ प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती ठाणे शहर शाखेद्धारा अंधश्रद्धेविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी ठाण्यात दिवसभराचे 'चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण शिबीर' २५ डिसेंबर रोजी, आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराचे मार्गदर्शक महा.अंनिस प्रकाशन विभागाचे राज्य कार्यवाह प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे हे आफेत. या शिबिराची नोंदणी करणे आवश्यक असून सदर शिबीरात सर्वांना मुक्त प्रवेश आहे, अशी माहिती महा अंनिसचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर व प्रधान सचिव अशोक मोहिते यांनी दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, ठाणे शहर शाखेद्वारे दिवसभराचे ‘चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण शिबीर’ गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी, मो. ह. विद्यालय, स्टेशन रोड, ठाणे (प.) येथे, सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे मार्गदर्शन महा.अंनिस प्रकाशन विभागाचे राज्य कार्यवाह प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे करणार आहेत. अंधश्रद्धा, बुवाबाजी व तथाकथित चमत्कारांचा वैज्ञानिक पद्धतीने पर्दाफाश कसा करावा, याचे सखोल व प्रत्यक्ष प्रशिक्षण या शिबिरात दिले जाणार आहे. चमत्कारांचे सादरीकरण कसे केले जाते, त्यामागील युक्त्या कोणत्या असतात आणि त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशा उघड करता येतात, याचे सविस्तर प्रात्यक्षिक व प्रशिक्षण या शिबिरात दिले जाईल.
सदर शिबिरासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून सर्वांसाठी मुक्त प्रवेश आहे, या शिबिरासाठी नोंदणी शुल्क १०० रुपये असून सहभागींसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत कार्य करू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.नोंदणीसाठी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, ठाणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष अनिल ठाणेकर : ९५९४६ ७९९२६, प्रपान सचिव अशोक मोहिते : ९९६७४ ४३८११ यांना संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे






