Home > News Update > Thackeray Brother Alliance : Shivsena(UBT)-MNS पक्षाची युती, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची अधिकृत घोषणा!

Thackeray Brother Alliance : Shivsena(UBT)-MNS पक्षाची युती, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची अधिकृत घोषणा!

Thackeray Brother Alliance : Shivsena(UBT)-MNS पक्षाची युती, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची अधिकृत घोषणा!
X

Maharashtra Politics महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. Shivsena शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षांमध्ये आगामी BMC Election महानगरपालिका निवडणुकांसाठी युती झाली आहे. ही बहुप्रतिक्षित युती वरळी येथील हॉटेल ब्लू सीमध्ये ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत अधिकृतपणे जाहीर केली आहे.

या घोषणेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधूंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चा अखेर यशस्वी झाल्या असून, मुंबई महानगरपालिका (बीएमसी)सह राज्यातील ठाणे, नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली आदी महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत.

एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, मुंबईला मराठी माणसांपासून तोडायचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. मराठी माणसाला सांगेन, आता जर का चुकाल, फुटाल तर पुर्णपणे संपाल. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर राज ठाकरे यांनी कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, त्या वाक्यापासून आमच्या एकत्र येण्याची सुरूवात झाली. शिवसेना-मनसेची युती झाली. जागावाटपाचा आकडा आत्ता सांगणार नाही. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरतायत, त्यात २ टोळ्या अॅड झाल्यात, त्या राजकीय पक्षांच्या आहेत ते उमेदवार पळवतात. अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

दरम्यान शिवसेना (उबाठा) नेते, खासदार संजय राऊत यांनी ही माहिती देताना म्हटले की, "ही युती मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण आहे.

या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. मराठी मतदारांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून, आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा प्रभाव पडेल.

Updated : 24 Dec 2025 12:11 PM IST
Next Story
Share it
Top