Home > News Update > महागाई वाढली,चमडे मिळेना, चप्पल उद्योगाचाच अंगठा तुटला

महागाई वाढली,चमडे मिळेना, चप्पल उद्योगाचाच अंगठा तुटला

महागाई वाढली,चमडे मिळेना, चप्पल उद्योगाचाच अंगठा तुटला
X

कच्च्या मालाचे वाढलेले दर, गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे चमड्याचा निर्माण झालेला तुटवडा यामुळे चर्मकार बांधवांचा पारंपारिक व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पहा हरिदास तावरे यांचा विशेष रिपोर्ट...

चमड्यापासून तयार झालेल्या चपलांना राज्यात मोठी मागणी होती. अशा मजबूत टिकाऊ चपला बनवणारा कुशल कारागीर वर्ग राज्यात अस्तित्वात आहे. परंतु सरकारच्या धोरणाचा तसेच गोवंश हत्याबंदी कायद्याचा मोठा परिणाम या व्यवसायावर झाल्याने या चर्मकार कारागिरांवर मोठे संकट कोसळले आहे. चप्पल तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्राण्यांच्या चमड्याचा तुटवडा आहे. याचबरोबर कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे चपलांचा उत्पादन खर्च वाढला आहे. परंतु ग्राहक जुन्याच किमतीत चपलांची मागणी करत आहे.

Updated : 10 July 2023 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top