Home > News Update > बालिका वधू फेम 'दादीसा' सुरेखा सिक्री यांचं निधन...

बालिका वधू फेम 'दादीसा' सुरेखा सिक्री यांचं निधन...

बालिका वधू फेम 'दादीसा' सुरेखा सिक्री यांचं निधन... Surekha Sikri dies of cardiac arrest at 75, National award winning actor

बालिका वधू फेम दादीसा सुरेखा सिक्री यांचं निधन...
X

कलर्स टीव्हीवर गाजलेल्या बालिका वधू सीरियलमध्ये दादीसा ची भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं वयाच्या 75 व्या हृदयविकारामुळे निधन झाले आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या सुरेखा सिक्री यांना बधाई हो मधील दादीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

बालिका वधू या मालिकेतून त्यांनी देशभरातल्या घरा-घरामध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती. सुरेखा सिक्री यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ताने ट्वीट केलं आहे.

'देव तुमच्या आत्म्याला शांती देवो सुरेखा जी.' मी नेहमी तुमची आठवण काढेल. प्रचंड नुकसान !! तुमचं टॅलेंट अप्रतिम होतं.


कोण होत्या सुरेखा सिक्री? who was surekha sikri

सुरेखा सिक्री यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला होता आणि त्यांचे बालपण अल्मोरहा आणि नैनितालमध्ये गेले. त्याचे वडील एअरफोर्समध्ये होते आणि आई एक शिक्षिका होती. सुरेखा 1971 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मधून उत्तीर्ण झाल्या होत्या. मुंबईत जाण्यापूर्वी त्यांनी एनएसडीबरोबर बराच काळ काम केलं. 1989 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही गौरविण्यात आले.

सुरेखा सिक्री यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात 1978 मध्ये 'किस कुर्सी का' या चित्रपटाद्वारे केली होती. इतकेच नाही तर त्यांना तमस (1988), मम्मो (1995) आणि बधाई हो (2018) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही देण्यात आला होता. 'बालिका वधू' या मालिकेत सुरेखा सिक्री यांनी दादीसा ची भूमिका साकारली आणि या पात्रातून त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली.

surekha Sikri Balika Vadhu Badhaai ho

Updated : 2021-07-16T11:56:41+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top