Home > News Update > अखेर ते ऊसतोड कामगार स्वगृही परतले !

अखेर ते ऊसतोड कामगार स्वगृही परतले !

अखेर ते ऊसतोड कामगार स्वगृही परतले !
X

कोरोनाच्या प्रसारामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हजारो ऊसतोड कामगार अडकून पडले आहेत. पण ऊसतोड कामगारांना आपल्या स्वगृही पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सर्वाधिक ऊसतोड मजूर स्थलांतर करण्याऱ्या बीड जिल्ह्यातले कामगार परतू लागले आहेत.

आतापर्यंत दोन हजारांहून अधिक कामगार आपल्या स्वगृही परतले आहेत. परंतु सतर्कता म्हणून या कामगारांना पुढचे 28 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. कामगारांना आपल्या शेतात किंवा ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणीच राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील 19 चेक पोस्टवरून ऊसतोड कामगारांना प्रवेश देण्यात येतोय. याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्तासह, आरोग्य विभागाचे कर्मचारी कामगारांची तपासणी करत असून, कामगारांमध्ये कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे.

हे ही वाचा..

Updated : 21 April 2020 8:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top