#कोरोनाशी लढा : अखेर विशेष रेल्वेसेवा ट्रॅकवर

कोरोनामुळे (Corona) लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (lockdown) ठप्प झालेली रेल्वे(Railway) सेवा आजपासून सुरू झाली आहे. १ जूनपासून श्रमिक ट्रेनव्यतिरिक इतर विशेष २०० रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा रेल्वेतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन (chhatrapati shivaji maharaj terminus) मध्यरात्री वाराणसीला जाणारी महानगरी एक्सप्रेस (Mahanagari Express)  सुरू करण्यात आली आहे.

हे ही वाचा..


‘Mission Begin Again’ तीन टप्प्यात, 3, 5 आणि 8 जून ला काय सुरु होणार?

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाले ३४२ कोटी, कोरोनावर खर्च फक्त 23 कोटींचा

3 जून पासून राज्य Unlock Mode वर, कोणत्या बाबींमध्ये सुट मिळणार?

मंगळवारपासून २०० ट्रेनमधून १ लाख ४५ हजार प्रवासी प्रवास करतील अशी माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. १ मे पासून स्थलांतरित मजुरांसाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमिक ट्रेनही सुरू राहणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. या २०० गाड्यांसाठी २२ मेपासून आरक्षण सुरू करण्यात आले होते. दरम्यान प्रवाशांनी स्टेशनवर, गाडीत आणि उतरल्यानंतर आरोग्यविषयक नियम आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.