Home > News Update > कपड्यांच्या कंटेनरमधून फटाक्यांची तस्करी, गुजरातमधून एकाला अटक

कपड्यांच्या कंटेनरमधून फटाक्यांची तस्करी, गुजरातमधून एकाला अटक

Smuggling of fireworks from a container of clothes, one arrested from Gujarat

कपड्यांच्या कंटेनरमधून फटाक्यांची तस्करी, गुजरातमधून एकाला अटक
X


नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चीनमधून आयात करण्यात आलेल्या महिलांच्या कपड्यांमध्ये चक्क ४ कोटी ८२ लाख रुपयांचे फटाके जप्त करण्यात आले. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या “ऑपरेशन फायर ट्रेल” अंतर्गत न्हावा शेवा बंदरामध्ये ही कारवाई करत एकाला गुजरातमधून अटक करण्यात आलीय.

महसूल गुप्तचर संचालनालयाने “ऑपरेशन फायर ट्रेल” अंतर्गत चिनी बनावटीचे फटाके आणि फटाक्यांच्या साहित्याचा बेकायदेशीर आयातीचा एक अत्याधुनिक तस्करीचा प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडला आहे.

या कारवाईदरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी न्हावा शेवा बंदरात 40 फूट लांबीचा कंटेनर पकडला, जो चीनमधून आयसीडी अंकलेश्वरला जात होता. या कंटेनरमध्ये “लेगिंग्ज” असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सविस्तर तपासणी केली असता कंटेनरच्या पुढील बाजूस ठेवलेल्या कपड्यांच्या थरामागे लपवलेले 46,640 फटाके आणि फटाक्यांचे साहित्य आढळले. या मालाची एकूण किंमत 4 कोटी 82 लाख रुपये असून कारवाईमध्ये संपूर्ण खेप जप्त करण्यात आली आहे. .

त्यानंतरच्या झालेल्या झडतीदरम्यान तस्करी करणाऱ्या टोळीच्या कार्यपद्धतीचा खुलासा करणारी अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आली. तसेच गुजरातमधील वेरावळ येथून या प्रकरणातील एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली.

फटाक्यांची आयात ही परराष्ट्र व्यापार धोरणातील आयटीसी (एचएस) वर्गीकरणानुसार प्रतिबंधित असून यासाठी विदेश व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) आणि पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्था (पीईएसओ) यांच्याकडून स्फोटक नियम, 2008 अंतर्गत परवाना घेणे आवश्यक आहे.

अशा धोकादायक वस्तूंच्या बेकायदेशीर आयातीमुळे सार्वजनिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा, बंदराच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना आणि व्यापक नौवहन आणि लॉजिस्टिक्स साखळीला गंभीर धोका निर्माण होतो. तस्करी विरोधी कारवायांमध्ये सजग राहून राष्ट्रीय पायाभूत सुविधांचे संरक्षण आणि जनतेच्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी सामना करण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय वचनबद्ध आहे.

Updated : 20 Oct 2025 7:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top