ट्रम्प भारतात कोरोना घेऊन आले : संजय राऊत

कोरोनामुळे(corona) १ जूनपासून ‘लॉकडाऊन ५’ (lockdown) म्हणजेच ‘अनलॉक १’ ची घोषणा करण्यात आली आहे. गेले अडीच महिने कोरोना आणि कोरोनाच्यासोबतीने कोरोनचं राजकारण आपण पाहत आलो आहोत. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) हे भारतात कोरोना विषाणू घेऊन आले असा आरोप केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आले होते. अहमदाबाद इथं ट्रम्प यांच्या स्वागतासाठी स्टेडियमवर लाखोंची गर्दी झाली होती. या कार्यक्रमातून गुजरातमध्ये कोरोना पसरल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.

हे ही वाचा…


3 जून पासून राज्य Unlock Mode वर, कोणत्या बाबींमध्ये सुट मिळणार?

मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीची दखल, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व वाढणार, ट्रम्प यांचे संकेत

अमेरिकेतून ट्रम्प यांच्यासोबत आलेले डेलिगेट्स हे दिल्ली आणि मुंबईत फिरले आणि त्यामुळे संक्रमण झपाट्याने पसरलं. संक्रमण वाढणं ही चिंता आहे आणि ती राष्ट्रव्यापी असायला हवी. महाराष्ट्रात संक्रमण वाढलं म्हणून राष्ट्रपती राजवट लावा सांगणारे या काळातही राजकारण करतात हे धक्कादायक आहे असं त्यांनी म्हटलंय. यासोबतच केंद्राचे अपयश स्पष्ट दिसत असतांना राज्यांना दोष का द्यायचा, असा सवालही त्यांनी केलाय.