Home > News Update > पहलगामवरील दहशतवादी हल्ल्याबाबतची माहिती NIA सोबत शेअर करा, – NIA ची नागरिकांना विनंती, संपर्क क्रमांक जाहीर

पहलगामवरील दहशतवादी हल्ल्याबाबतची माहिती NIA सोबत शेअर करा, – NIA ची नागरिकांना विनंती, संपर्क क्रमांक जाहीर

पहलगामवरील दहशतवादी हल्ल्याबाबतची माहिती NIA सोबत शेअर करा,    – NIA ची नागरिकांना विनंती, संपर्क क्रमांक जाहीर
X

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात (NIA) ने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत अधिक माहिती, फोटो किंवा व्हिडिओ असलेल्या पर्यटक, स्थानिक नागरिक आणि साक्षीदारांना तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केलंय.

NIA ने कडे या हल्ल्याचे बरेच फोटो आणि व्हिडिओ आहेत. त्यांची बारकाईनं तपासणी सुरूय. मात्र अजून कुठलीही महत्त्वाची माहिती सुटू नये म्हणून एनआयएने तपासाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

आज अधिकृत संकेतस्थळ आणि सोशल मिडिया हँडल्सद्वारे जारी केलेल्या आवाहनात NIA ने नागरिकांना मोबाईल क्रमांक 9654958816 किंवा लँडलाइन क्रमांक 01124368800 वर संपर्क साधून आपली माहिती, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यास सांगितले आहे. संबंधित अधिकृत अधिकारी त्यानंतर संपर्क साधून माहिती गोळा करतील, असेही एनआयएनं स्पष्ट केलंय.

पहलगाम हल्ल्याच्या तपासाची प्रमुख यंत्रणा म्हणून एनआयए काम करत आहे. हल्लेखोरांचा तपशील आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा मागोवा घेण्यासाठी एनआयए सर्व पुरावे बारकाईनं तपासणार आहे. बऱ्याच नागरिकांनी अनावधानानं किंवा जाणूनबुजून असे काही पाहिले, ऐकले किंवा चित्रीत केले असेल जे या कटाचा उलगडा करण्यात मदत करू शकेल, अशी माहिती देण्याचं आवाहन एनआयकडून करण्यात आलंय.

२२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या या भयंकर दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण गंभीर जखमी झाले होते. अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या फिरत आहेत. NIA ची टीम हे सर्व पुरावे संकलित करून तपासाच्या अनुषंगानं त्यांचा अभ्यास करत आहे. NIA चं पथक पहलगाममध्ये ठाण मांडून आहे आणि साक्षीदारांची चौकशी तसेच घटनास्थळी पुरावे गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं एनआयएकडून सांगण्यात आलंय.

Updated : 7 May 2025 7:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top