Home > News Update > ''शिवसेना फोडण्याचे गिरीश महाजन यांचे मिशन असेल..'' - आ. संजय गायकवाड

''शिवसेना फोडण्याचे गिरीश महाजन यांचे मिशन असेल..'' - आ. संजय गायकवाड

शिवसेना फोडण्याचे गिरीश महाजन यांचे मिशन असेल.. - आ. संजय गायकवाड
X

शिवसेना फोडण्याच आमचं मिशन होतं, आणि आम्ही ते पूर्ण केले असं गिरीश महाजन यांनी सांगितले. गिरीश महाजन यांचे विधान बुलढण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खोडून काढले आहे. गिरीश महाजन यांनी केलेलं हे विधान चुकीचं आहे. आम्ही भाजपमुळे शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही, तर उद्धव ठाकरे घराच्या बाहेर येत नव्हते, आमची कुठलीच कामे होत नव्हती, आम्हाला वर्षावर, मातोश्रीवर एन्ट्री नव्हती, त्यामुळे आम्ही बाहेर पडलो आहे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते, त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही, असा खोचक टोला देखील आमदार संजय गायकवाड यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे. तर हसन मुश्रीफ यांच्यावर ईडी ची झालेली कारवाही पक्ष किंवा नेता म्हणून नव्हे तर त्यांच्या कारखान्यातील गैरव्यवहारामुळे झाली असल्याचेही आमदार गायकवाड यांनी म्हटल आहे.


Updated : 11 Jan 2023 12:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top