Home > News Update > Balasaheb Thackeray Birth Centenary : "महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला तर शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही"

Balasaheb Thackeray Birth Centenary : "महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला तर शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही"

Balasaheb Thackeray Birth Centenary : महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला तर शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही
X

Balasaheb Thackeray Birth Centenary २३ जानेवारी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती... शिवसेनाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीला सिंहगर्जनेची शताब्दी या शीर्षकाखाली भावपूर्ण आणि प्रेरणादायी संपादकीय प्रकाशित झालं आहे. १०० व्या जयंतीनिमित्त बाळासाहेब यांच्या आठवणींना, विचारांना, कार्याला उजाळा दिला आहे. तसेच मराठी माणूस, प्रेम, हिंदुत्व यावर भाष्य करत भाजपालाही टोला लगावला आहे. पाहा काय म्हटलंय...




अग्रलेखात म्हटले आहे की, बाळासाहेबांसारख्या महान व्यक्तींचे मोठेपण त्यांच्या वयावर अवलंबून नसते. बाळासाहेबांसारखे नेते सदैव हवेहवेसे वाटतात. त्यांचे मोठेपण वयावर अवलंबून नसते. कार्यावर, विचारांवर आणि त्यांनी आपल्या समाजासाठी केलेल्या योगदानावर अवलंबून असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहगर्जनेला शंभर वर्षे झाली तरी ती आजही जमिनीवर आणि आसमंतात घुमत आहे. हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी बाळासाहेबांनी दिलेल्या लढ्याचा उल्लेख करत अग्रलेखात सांगितले आहे की, भारतीय घटनेनुसार प्रत्येक भाषिकासाठी स्वतंत्र राज्य झाले, पण मराठी माणसाला मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी साडेचार वर्षे दिल्लीशी युद्ध करावे लागले. मराठी माणसाने रक्त सांडले, बलिदाने दिली. म्हणूनच महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे.




"महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला तर शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही" ही बाळासाहेबांची सिंहगर्जना आजही जिवंत आहे. बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची सिंहगर्जना होती. ही सिंहगर्जना घुमत राहिल्यामुळेच महाराष्ट्र सुरक्षित आहे आणि मुंबईवर मराठी ठसा कायम राहिला.




हे संपादकीय आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीला प्रकाशित झाले असून, त्यात शिवसेनाच्या विचारसरणीला आणि मराठी माणसाच्या एकजुटीला प्रेरणा देणारा संदेश आहे. आज माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या भव्य सोहळ्यातही या सिंहगर्जनेचे स्मरण होणार आहे.





Updated : 23 Jan 2026 9:51 AM IST
Next Story
Share it
Top