BJPने तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्ता आनंद थम्पीची आत्महत्या
X
धक्कादायक, केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनं तेथील स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. मृताचे नाव आनंद के. थम्पी असं असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कोण होता आनंद थम्पी?
32 वर्षाय आनंद थम्पी हा तिरुअनंतपुरमधील त्रिकन्नापुरम येथील रहिवासी होता. आपल्या परिसरातील सक्रिय आरएसएस कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख होती. अनेक दिवसांपासून त्याला भाजपच्या तिकिटवर निवडणुक लढायची होती. परंतु त्याला तिकिट नाकारण्यात आल्यानं त्याने स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपा पक्षाकडून आपल्याला उमेदवारीचं तिकिट दिलं जाईल अशी समज आनंद याची होती परंतु त्याला तिकिट न देता परिसरातील वाळू माफियाला तिकिट दिलं गेलं. हे कळताच त्याने निराश होऊन आपल्या मित्राला व्हाटसअपवर सुसाइड नोट पाठवून गळफास घेतला.
सुसाइड नोट मध्ये आनंद ने पक्षातील स्थानिक राजकारण आणि वाळू माफियांशी संबंधित असलेल्या लोकांचा उल्लेख केला.
विनोद कुमार (भाजपा उमेदवार)
उदयकुमार (क्षेत्र सचिव)
कृष्णकुमार (समिती सदस्य)
राजेश (नगर कार्यवाह) अशा लोकांची नावे घेतली आहे. तसेच मानसिक त्रास देत असल्याचंही म्हटलं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी काय म्हटलंय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने सोशल मीडियावर उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली होती, परंतु आनंदला त्यात त्याचे नाव आढळले नाही. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एका मित्राला व्हॉट्सअॅप संदेश पाठवला आणि भाजप आणि आरएसएसवर आरोप केले. त्याने त्याच्या मित्राला सांगितले की तो शनिवारी दुपारी आत्महत्या करेल. आनंद यांनी दावा केला की त्यांनी संघाच्या नेत्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे कळवले होते. परंतु, त्यांना तिकीट नाकारण्यात आले आणि त्याऐवजी वाळू तस्करी माफियांशी संबंध असलेल्या दुसऱ्या नेत्याला तिकीट देण्यात आले. आनंदचा संदेश मिळताच त्याचा मित्र ताबडतोब त्याच्या घरी पोहोचला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आनंदला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भाजप अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला.
राजीव चंद्रशेखर यांच्या मते, मी जिल्हाध्यक्षांकडे या प्रकरणाची चौकशी केली, त्यांनी सांगितले की आनंदचे नाव प्रभागातून मिळालेल्या यादीत नाही. तथापि, आम्ही घटनेची चौकशी करत आहोत.
भाजप जिल्हाध्यक्षांनी असेही स्पष्ट केले की, आनंद यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती, त्यामुळे त्यांचे नाव यादीत समाविष्ट केले गेले नाही. केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी करत आहेत.






