राहुल गांधींनी पुन्हा पक्षाध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी हालचाली?

Rajasthan CM Ashok Gehlot demands Rahul Gandhi should again become president of party

लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. पण आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाध्यक्ष पद स्वीकारावं अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी बुधवारी देशातील काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

या बैठकीत देखील सर्वच राज्यांच्या प्रमुखांनी कार्यकर्त्यांची हीच मागणी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी देखील राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पद स्वीकारावं अशा आशयाची पत्र पाठवलेली आहेत.

हे ही वाचा..

मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, परीक्षांबाबत हस्तक्षेपाची मागणी…

रामदेव बाबांच्या औषधाची खरी सत्यता काय : महेश झगडे

Modi vs Manmohan मोदींच परराष्ट्र धोरण आत्तापर्यंतच्या सरकारच्या परराष्ट्र धोरणापेक्षा श्रेष्ठ आहे का?

कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये अनेक नेत्यांनी पक्षाध्यक्ष पद स्वीकारण्याची विनंती केल्यानंतर राहुल गांधी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी राहुल गांधींनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली होती. पण प्रत्येक वेळी राहुल गांधी यांनी स्पष्ट शब्दात पुन्हा एकदा ती जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता. पण आता ही मागणी पुन्हा जोर धरू लागल्यानंतर राहुल गांधींनी होकार दिला नसला तरी नकारही दिलेला नाही, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here