मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, परीक्षांबाबत हस्तक्षेपाची मागणी…

Chief minister of Maharashtra Uddhav thackeray
Courtesy : Social Media

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने एमडी आणि एम एस च्या अंतिम वर्षाच्या परीक्षा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलाव्यात अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. तसेच या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हस्तक्षेप करावा आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला तसे आदेश द्यावे अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांकडे केलेली आहे.

महाराष्ट्र सध्या कोरोनाशी लढतो आहे आणि या लढाईमध्ये मेडिकलच्या अंतिम वर्षाचे निवासी डॉक्टर कोव्हीड योद्धे म्हणून आपली कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा डिसेंबरमध्ये घ्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केलेली आहे.

हे ही वाचा..

केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक, देशव्यापी आंदोलनाची हाक

रामदेव बाबांच्या औषधाची खरी सत्यता काय : महेश झगडे

Modi vs Manmohan मोदींच परराष्ट्र धोरण आत्तापर्यंतच्या सरकारच्या परराष्ट्र धोरणापेक्षा श्रेष्ठ आहे का?

एमसीआयने 18 जून रोजी पाठवलेल्या पत्रामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात असे सांगितलेले आहे. यानुसार महाराष्ट्रात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 15 जुलैपर्यंत या परीक्षा घेण्यात याव्यात असे सांगितले आहे. पण सध्या राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार सुरू आहेत.

याच दरम्यान जर हे प्रशिक्षित डॉक्टर परीक्षेसाठी गेले तर राज्यात डॉक्टरांचा तुटवडा निर्माण होईल अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here