“15 ऑगस्टपर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करा अन्यथा”

49

मार्चपासून कोरोनाची परिस्थिती बदलत चालली आहे. सरकारने ऑफिस सुरू केले आहेत, पण लोकांना जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाहीये. त्यामुळे सरकारने तातडीने ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करावी, तसेच सर्व दुकाने पूर्णवेळ सुरू करावीत अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

हे ही वाचा…

सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण!

दरवर्षी पुरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या पुलामुळे 15 गावांना फटका

राज्याचा मृत्यूदर ३.४२ % वर, 0 % वर कधी येणार?

वंचित बहुजन आघाडीतर्फे बुधवारी राज्यभरात लॉकडाऊन विरोधात डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरुन निदर्शने केली. नागपूरात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. राज्यातील एसटी सेवा सुरू करण्यात यावी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

सरकारने 15 ऑगस्टपर्यंत निर्णय घेतला नाही तर त्यानंतर वंचित बहुजन आघाडी लॉकडाऊनचे कोणतेही नियम पाळणार नाही असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. एसटीच्या बस बंद करुन सरकारने खासगी बसेसला परवानगी दिली. त्यामुळे खासगी बसेसच्या नावाने सरकारनेच लोकांची जादा पैसे घेऊन लूट केली असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

Comments