Home > News Update > माफीयाराज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवा? पंकजा मुंडे संतापल्या

माफीयाराज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवा? पंकजा मुंडे संतापल्या

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच बीड जिल्ह्यातील कार्यकारी अभियंत्याने राजकीय दबाव वाढत आहे. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवरून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली. तर माफीयाराज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवा? असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला.

माफीयाराज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवा? पंकजा मुंडे संतापल्या
X

पंकजा मुंडे पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, सरकारी अधिकाऱ्यांना जिल्ह्यात काम करणे कठीण झाले आहे. खोट्या बीलावर सह्या करण्यासाठी गुत्तेदारांपासून संरक्षण मिळावे यासाठी कार्यकारी अभियंता असलेल्या अधिकाऱ्याने स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरची मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय ठेकेदारांपासून संरक्षण मिळवण्याची मागणी करण्याची वेळ येणं, हे दुर्दैव आहे. तर बीड जिल्हयात माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय, असे म्हणत याला सत्तेचा पाठिंबा नाही कशावरून? असा सवालही पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.

अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. कंत्राटदार धमक्या देऊन, कटयार दाखवून बिलावर सह्या घेतल्या जातात, त्यामुळे कार्यकारी अभियंता संजय कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर देण्याची मागणी केली हे धक्कादायक आहे. तर जिल्हयातील कायदा सुव्यवस्थेवर सत्ताधारी नेत्यांचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे जिल्ह्यात वाळू माफिया, गुटखा माफिया, चोरांना, गुंडांना अभय दिले जाते. तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांवर खोट्या केस दाखल केल्या जातात. तसेच व्यापाऱ्यांच्या एजन्सी हडप करणे, चांगल्या संस्थेवर दबाव टाकून प्रशासक आणणे, अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर सुरू आहे.

सत्ताधारी नेत्यांकडून गुंडांना पाठीशी घालण्याचे काम केले जात असून जिल्ह्यात कायद्याचा कसलाही धाक राहिला नाही. त्यामुळे राजकीय ठेकेदार मर्जीविरोधात जाणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. या प्रकाराला सर्वच विभागातले अधिकारी वैतागले आहेत. पण तक्रार करायला कुणी धजावत नाही. तर जिल्हयातील सत्ताधाऱ्यांना हेच हवं आहे. मात्र कार्यकारी अभियंता असलेल्या अधिकाऱ्यांना स्वसंरक्षणाची मागणी करावी लागते. त्यावरून जिल्ह्यात माफिया राज बोकाळले आहे का?, असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

Updated : 10 Jan 2022 2:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top