Home > News Update > विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीच्या उमेदवारांची अखेर घोषणा...

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीच्या उमेदवारांची अखेर घोषणा...

विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत असताना राष्ट्रवादीने औरंगाबाद आणि पुणे विभागातून उमेदवारांची घोषणा केली आहे... वाचा कोणाला मिळाली उमेदवारी?

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीच्या उमेदवारांची अखेर घोषणा...
X

विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून अरुण लाड यांच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज या नावांची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार कधी जाहीर करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सतीश चव्हाण आणि अरुण लाड यांच्या नावाची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेले दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.


Updated : 12 Nov 2020 5:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top