Home > News Update > Karad Bus Accident : नाशिकच्या विद्यार्थ्यांची सहल बस २० फूट दरीत कोसळली, जखमींवर उपचार सुरु

Karad Bus Accident : नाशिकच्या विद्यार्थ्यांची सहल बस २० फूट दरीत कोसळली, जखमींवर उपचार सुरु

Karad Bus Accident : नाशिकच्या विद्यार्थ्यांची सहल बस २० फूट दरीत कोसळली, जखमींवर उपचार सुरु
X

Pune Bangalore Highway पुणे-बंगळुर महामार्गावर साताऱ्यातील कराड जवळ वाठार गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी (दि.१ डिसेंबर २०२५) मोठी दुर्घटना घडली आहे Karad Bus Accident. नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील लेट बी. पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, पिंपळगाव बसवंत या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहलीची बस 20 फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक होते.

या दुर्घटनेत ५ विद्यार्थी गंभीर जखमी तर १५ पेक्षा अधिक विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व जखमींना तात्काळ कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केलं असून ऋषिकेश पाचोरकर, प्रज्वल माहेर,सार्थक चव्हाण, पीयूष काळे या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साताराचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांवर आवश्यक ते उपचार होण्याबाबत चर्चा केली आहेत. कराड चे तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहेत. सध्या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी कराड पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून अपघाताचे कारण नेमके काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पुणे-बंगळुर महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे सातारा ते कराड दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यात वळणे. रस्त्याच्या बाजून खोदकाम सुरु असल्यामुळे या ठिकामी सतत अपघात होत आहे.

Updated : 2 Dec 2025 11:39 AM IST
Next Story
Share it
Top